माणसं असे का वागत असतील?


या पृथ्वीवर अनेक जीव आहेत त्यापैकी मानव हा सर्वात प्रगत आणि हुशार असा जीव आहे. माणुस हा खुप विचीत्र प्राणी आहे. माणसांचे त्यांच्या वागण्यावरून अनेक प्रकार पडतात काही माणसे खुप कडक शिस्तीचे असतात, काही बिन्‍दास असतात तर काही खुप खडुस असतात, काही अगदी मायाळु स्वभावाची तर काही कपटी आणि कारस्थानी स्वभावाचे असतात. मला यातील जवळपास सर्व प्रकारची मानसे भेटली.खुप वेळा माझे त्यांच्याशी जमले नाही,कधी त्यांचे वागणे मला तर कधी माझे वागणे त्यांना खटकत असे परंतु जेव्हा-जेव्हा समोरा समोर येऊन बोलत असु तेव्हा मात्र मणात कसलाही मळ न राखता अगदी झाल गेलं विसरून कुठलाही आकस न ठेवता आम्ही पुन्हा कामाला लागलो.
 मात्र वरील प्रकारातील कपटी आणि कारस्थानी लोक हे कायम असमाधानीच राहीलेली मी पाहीतले आहेत. खर तर या लोकांना इतरांचे चांगले झालेले खपत नाही. यांना इतरांची प्रगती देखवत नाही यांच्या कायम पोटात दुखत असते. यांच्या इच्छा कधीही पुर्ण होत नाहीत. या प्रकारातील माणसे सतत इतरांना त्रास देण्याच्या नव-नवीन युक्त्या शोधत असतात. या प्राकारातील माणसं म्हणजे निचपणाचा कळस असतात. हे कधी कुठल्या थराला जातील याचा काही नेम नसतो. ही माणसं कधीच कुठली गोष्ट बोलुन दाखवत नाहीत. यांच्या डोक्यात सतत काहीतरी कुरापती आणि कट शिजत असतात. यांच्यात माणुसकी नावाची चीजच नसते यांना माणुसकीशी काहीच देण-घेण नसत.
खर तर माणसाने कसं अगदी स्वच्छ मनाच,स्वच्छंदी  विचाराच आणि बिन्दास असावं. आपण केवढे भाग्यवान आहोत की आपल्याला मानवाचा जन्म मिळाला आहे. पोथ्या-पुराणात सांगीतलं आहे की कित्येक किडे मकोड्यांचे जन्म घेतल्यानंतर माणव जन्म मिळतो तो एकमेकांना समजुन माणुसकीने जगुन सार्थकी लावायला पाहीजे. एखाद्याचे चुकले तर मोठ्या मनाने त्याला समाजावुन सांगुन माफ केले पाहीजे. कधी आपले चुकले तर आपणही आपली चुक मान्य करायला हवी मग भलेही आपण मोठे जहागीरदार का असेनात.माणुस मानसाशी छल कपट न करता प्रेमाने वागला तर या पृथ्वीचा स्वर्ग होइल. नाहीतर अशा माणसांना मरूनही नरकातच जाण्याची घाई असते कारण यांची कर्म पाहुन स्वर्गाची दार यांना केव्हाच बंद झालेली असतात. यांना चागले कर्म करण्याची इच्छा नसते. संधी खुप येतात पण जन्मजात असलेल्या कपटी भावनेमुळे त्यांचे हात चांगल्या कामाला धजावतच नसतात. ह्यांच्या चेहऱ्यावर सतत बारा वाजलेले असतात. ह्यांच्याकडे सर्व वाईट काम करण्याचे हातकंडे असतात. अशी मानसं या पृथ्वीवर खुप कमी प्रमाणात मिळतात पण मिळतातच आणि विशेष म्हणजे प्रत्येकांना या प्रकारातील एक तरी माणुस मिळतोच मिळतो.मला देखील मिळाला आहे तुम्हाला मिळाला असेल तर तुम्ही देखील आपल्या भावना शब्द रूपाने प्रकट करून तुमचे मन हलके करू शकता.चला तर मग तुम्हाला मिळालेल्या अशा हलकट,कपटी आणि निच माणसांना आठवुन हा लेख पुन्हा एकदा स्मरण करूयात.

Comments

Popular posts from this blog

कुरूप बदकाचं पिल्लु?

निसर्ग आपला सखा