Posts

Showing posts from June, 2019

कुरूप बदकाचं पिल्लु?

Image
परवाच दहावीचा निकाल जाहीर झाला.अनेकजण भरघोस टक्के मार्क घेऊन पास झाले. त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. त्यांनी मिळविलेल्या यशा बद्दल त्यांचे कौतुक व्हायलाच हवे ! यात दुमत नाही मात्र याचवेळी कमी मार्क घेणारांना घरच्यांसह शेजाऱ्यांचे व पाहुण्यांचे टोमणे सहन करावे लागत आहेत. या टोमण्यांमुळे मात्र या विद्यार्थ्यांची पुरती पंचायत होत आहे.टक्केवारी चांगली आहे पण त्याच्या किंवा तिच्या एवढी का नाही म्हणुन पालक मुला-मुलींना दुखावत असल्याने कित्येक विद्यार्थी स्वत : ला कोसताना पहावयास मिळत आहेत.मला या सर्व विद्यार्थ्यांना एक गोष्ट सांगायची आहे.ती गोष्ट आहे एका कुरूप बदकाच्या पिलाची.             एका बदकाला चार पिल्लं होतात त्यातील तीन पिलं अगदी छान दिसत असतात, मात्र चौथे पिल्लु जरा कुरूप दिसत असते.ते कुरूप दिसत असल्यामुळे त्याची तीन्ही भावंड त्याला कुरूप म्हणुन चिडवत असतात. खेळायला जायचे असल्यास ते भावंड त्याला सोबत घेत नसत व त्याला दिसण्यावरून त्याला सतत चिडवत असत. त्यांचे पाहुन इतर प्राणी देखील त्या पिलाला चिडवायला लागतात. त्यांच्या त्या   चिडवण्यामुळे ते पिल्लु पुरतं खचुन जातं.