Posts

Showing posts from April, 2020

सेक्स एज्युकेशन अर्थात लैंगिक शिक्षण

आपल्या भारत देशात अनेक लैंगिक अपराध घडतात. काही उघडकीस येतात तर काहीजण बेआब्रु होईल म्हणुन प्रकरणं दाबले जातात. यांचं कारण शोधायला लागलो तर लैंगिक शिक्षणाचा अभाव आणि त्याबाबतची उदासीनता या गोष्टींमुळे काही प्रमाणात आपण या गुन्ह्याना थांबवन्यात कमी पडत आहेत असे लक्षात येते. मध्यंतरीच्या काळात आपल्या शिक्षण विभागाने लैंगिक शिक्षण हा विषय अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु काही मंडळींना असले शिक्षण आपल्या पाल्यांना दिले तर त्याचा त्यांच्या मनावर वाईट परिणाम होईल, म्हणुन यावर नाराजी व्यक्त केली आणि लैंगिक शिक्षण अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याचा प्रयत्न विफल ठरला. आपली भारतीय संस्कृती महान असुन कित्येक वर्षांपासूनची परंपरा आपल्याला लाभली आहे. आपल्या भारतीय संस्कृतीवर पाश्र्चात्य देशांनी संशोधन करून त्यातील अनेक गोष्टी अंगीकारल्या आहेत मात्र आपण त्यांना आजही स्विकारत नाहीत त्यातीलच एक म्हणजे लैंगिकता. आपल्याकडे ३३ कोटी (प्रकारचे) देव आहेत. त्यात कामदेव आणि रती देवी हे लैंगिकतेचे देव आपल्याच पुराणातील आहेत तर कामसुत्र हा जगप्रसिद्ध ग्रंथ आपल्याच वात्सायन ऋषींनी लिहीलेला आहे