Posts

Showing posts from September, 2020

निसर्ग आपला सखा

Image
निसर्गासारखा मित्र शोधुन सापडणार नाही. जसं मित्र सोबतीला असतील तर माणूस अगदी बिंदास असतो, आनंदी असतो कसली चिंता नसते ना कशाची फिकीर असते. जगातील सर्वात सुरक्षित जागा म्हणजे मित्रांचा सहवास असतो. त्यातल्या त्यात मित्रांसमवेत निसर्गाचे सान्निध्य लाभणे म्हणजे स्वर्गीय अनुभूती घेण्यासारखे आहे. तो स्वर्गिय अनुभव आज आम्ही मित्रांनी घेतला. जागतिक महामारी कोरोनामुळे बहुतेक अॉफिसनी वर्क फ्रॉम होम सुरू केले आणि बऱ्याच दिवसानंतर विविध शहरांत कामानिमित्त विखुरलेले मित्र गावातील कट्ट्यावर जमले. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या आणि मग कुठेतरी बाहेर जाऊया असा प्लॅन ठरला. पण तो प्रत्यक्षात आणायला अनेक अठवडे खर्ची पडले. शेवटी काल ठरले की उद्या सकाळी जायचेच. मग ठरल्या प्रमाणे सकाळी लवकर उठून फोन करायला सुरुवात झाली. त्यात दोन-तीन जणांनी टांग दिली आणि परत एकदा प्लॅन कॅन्सल होतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. पण इरादा पक्का होता म्हणुन "दो से भले चार" म्हणत अविनाश,मी आणि अलीम आम्ही तिघांनी गाड्या रस्त्यावर काढल्या पुढे जवळ्यात हरी केव्हाच आमची वाट बघत बसला होता. त्याला घेऊन  अखेर मा