“पाणी आलं रे गणु”


आज पुन्हा एकदा एक निरीक्षण घेऊन आलो आहे, प्रसंग तसा नवीन किंवा अनोळखी नाही. साधारण सायंकाळचे पाच वाजले असतील माझा फोन खणाणला पलीकडुन आवाज आला, पाणी येणार आहे लवकर घरी ये.” फोनवर माझे वडील होते.गेली पंधरा ते विस दिवस झालं डोळयात पाणी आणुन आम्ही पाण्याची वाट पाहत होतो.आज पाणी येणार म्हणुन मी ऑफीसातली सर्व कामे टाकुण पटकन धावत घराच्या दिशेने निघालो.घाई गडबडीत घराकडे निघालो असल्याने रस्त्याने होत असलेल्या गोंगाट आणि गोंधळाकडे माझं फारसं लक्ष नव्हत घरापर्यंत पोहोचलोच होतो तेवढ्यात आमच्या शेजारी राहणाऱ्या राधा मावशीच्या घरासमोर थोडीशी गर्दी दिसली तसे पाणी आल्यानंतर घरासमोर गर्दी म्हणजे पाणी पाहीजे असेल म्हणुन आले असतील असं मला वाटलं, पण जवळ जाताच गर्दीतुन आवाज आला मोटर बंद करा आगोदरहो सद्या आमच्या गावात पाण्याचा प्रश्न अगदीच गंभीर झाला आहे.काल पाणी आले पिण्याचा माठ भरतो न भरतो तोच नळाने नटखटपणे गुळण्या मारायला सुरू केले, ते पाहुण रांजणी तर लगेचच रूसुबाइर रूसु म्हणत कोपऱ्यात जाऊन बसली ते थेट आजच तीचा रूसवा काढण्याचा योग आला होता.त्यात राधा मावशीच्या घरी उद्या कार्यक्रम म्हणुन जास्तीचं पाणी लागणार होतं.त्यामुळेच राधा मावशीने अत्यंत शांत स्वभावाची आरडा ओरडा न करणारी पाण्याची मोटार अंगणातील नळाला लावली होती पण कोण कुणास ठाऊक लोकाला कसं माहीत झालं आण अर्धी गल्ली राधा मावशीच्या दारासमोर मोटर बंद करण्या उभी राहीली.राधा मावशीने रागारागाने मोटर बंद केली आणि बाहेर टोपल्यात नळ लावुन मधुर (?) आवाजात काही वाक्य उच्चारत आणि पाणि सोडणाराच्या नावाने चांगभलं करत ( तसे सर्वजणच पाण्यावाल्याच्या नावाने चांगभलं करत असतात त्यात राधा मावशी अपवाद कशा असतील.) हंड्याने पाणी भरायला सुरूवात केली तोच नळाने त्याचा नटखटपणा दाखवायला सुरू केला आणि मावशींचा पारा चढला. आपल्यापेक्षा शेजाऱ्याचा नळाला फुल्ल पाणी येत असल्याचा साक्षातकार त्यांना झाला ( तसा तो प्रत्येकांनाच होत असतो.) पण काही बोलणार त्याच्या अगोदर सर्वांच्या नळाचे पाणि चंपट झाले होते. ते पाहुन मावशीचा रांग जरा शांत झाला (शेवटी माणसं जसं आपली लाईट गेल्यावर शेजाऱ्याचं घर बघतात आणि अंधार दिसला की शांत होतात, तसचं पण्याचं. सर्वांचच गेलं म्हण्ल्यावर त्याला काय इलाज?)
       बऱ्याच वेळापासुन रागात असलेल्या राधा मावशी आता मात्र शांत झाल्या होत्या.तोच खालच्या गल्लीतल्या नळावाल्यांनी मोटरा लावल्यामुळं आपल्याला पाणी आलं नाही ही बातमी घेऊन न्यानु धावत आला आणि सर्वजण मोटरा बघायला गेले. पुन्हा तीथं तेच रामायण घडलं आणि दहा मिनीट आणखी पाणी सांडण्याची कबुली घेऊन पाण्याच्या प्रश्नाचं तोडपाणी झालं. दहा मिनीट पुन्हा पाणी येणार म्हणल्यावर सगळीकडे कसा आनंद पसरला अचानक गेलेलं पाणी परत येणार म्हणुन सर्वजण अगदी लढाईला निघालेल्या हत्यारबंद सैनिकासारखे हंडे,घागरी,कळश्या,बकीटा,गुंडी,टोपलं,तांब्या घेऊन सज्ज झाले आणि पुन्हा त्या सिर्फ तुम मधल्या कब आओगे..... कब आओगे,जिस्मसे जान निकल जायेगी तब आओगे? देर ना हो जाए... कही देर ना हो जाए... गीतामधील नायीकेसारखं अगदी डोळयात पाणी आणुन सर्व मंडळी पाण्याची वाट बघत बसली. वातावरण अगदी शांत झालं होत सर्वांचा राग शांत होऊन आता लाडी गोडीच्या गप्पा सुरू झाल्या होत्या.पाण्यामुळे माणसां माणसांत किती लवकर मतभेद होतात याचे उत्तम उदाहरण मला आज पहायला मिळाले.थोडया वेळात पुन्हा पाणी आले मग सर्वांचे पाणी भरणे झाले मात्र या पण्यासाठी तब्बल दोन तास ताटकळत नळाला राखण बसावं लागलं आणि टोपल्यातुन गुडीने पाणी भरण्याचा आनंद (?) घेता आला. शिवाय बकेटाने पाणी भरताना जो व्यायाम झाला (?) तो वेगळाचं. तसं आमच्या गावाला पाण्याची कमी नाही (?) पण सरपंचाच्या गावकऱ्यांप्रती असणाऱ्या काळजीपोटी (?) आम्हाला असे पंधरा दिवसाला थोडे-थोडे पाणी सोडले जाते.ज्यामुळे माणसांची धावपळ होऊन त्यांना वॉर्म अप (व्यायाम करण्याच्या आगोदरची क्रिया) करता येतं आणि पाणी सुरु झाले की तरूणांसह अबाल वृध्द बकीटा,हांडे,कॅन्ड घेऊन व्यायामाला लागतात.ज्याचा फायदा वजण वाढलेल्या, रक्तदाब असणाऱ्या,शुगर असणाऱ्या आजी अजोबांना तसेच सकाळी केवळ लवकर उठणे होत नाही म्हणुन सिक्स पॅक बनवायचे राहीले असलेल्या आमच्या सारख्या असंख्य तरूणांना होतो.कदाचीत म्हणुनच आमच्या गावात व्यायाम शाळा (जीम) जास्त दिवस चालत नसावी.असो असे आहे आमचे गाव आणि आमच्या गावाच्या आरोग्याचा विचार करणारी ग्रामपंचायत. आम्ही बनवायलो सिक्स पॅक तुम्ही रहा तसेच टाकीत पाईप लाऊन पोटाचे टायर करून घेणारे. ढेरपोटे. छान आहे ना आमच्या गावाची गोष्ट..... मग शेअर करायला विसरू नका.

तुमचाच : ग्रामपंचायत कधी पाणी सोडेल यावर भरोसा नसणारा गणु, 9561430671,ingoleganesh765@gmail.com

Comments

Popular posts from this blog

कुरूप बदकाचं पिल्लु?

निसर्ग आपला सखा