गणु, तुझा सरकारवर भरोसा न्हाय काय?


‍विशेष सुचना : ज्यांना विनोदी भाषा कळत नाही त्यांनी लेख नाही वाचला तरी चालेल.विशेष करून भक्तांनी.

साधारण सायंकाळच्या पाच वाजेची वेळ असेल, मी ऑफीसातलं काम संपवुन घराच्या दिशेने चाललो होतो तेव्हा बाजुच्या दुकानातुन अचानक माझ्या नावाने आरोळी आली.अचानक आलेली आरोळी ऐकुन मी मागे पाहीले तर ती आरोळी माझ्याच एका नातेवाइकाने दिली होती.कधी जास्त न बोलणारे म्हणुन मी त्यांच्या हाकेला ओ देत रस्त्याच्या बाजुलाच असणाऱ्या एका दुकानात जेथे ते बसले होते तीथे गेलो. मी काही बोलण्याच्या आत त्यांनी सरकारवर भरोसा नाही का?” असा प्रश्न मला विचारला.हा प्रश्न त्यांनी मलाच का विचारला या गोष्टीचा अंदाज मला लगेचच लागला (कारण थोडयाच वेळार्वी राज्यातील सरकारने मराठा आरक्षणाचे विधेयक कसलाही आक्षेप न घेता एकमताने संमत केले होते. त्याचाच सोहळा ते त्या दुकानातील दुरचित्रवाणीवर बघत बसले होते आणि शेवटी याच सरकारने मराठा आरक्षण दिले की नाही म्हणत टिऱ्या बडवीत वाहवा लुटत होते.त्यावर मी मागील सरकारने गंडवले हे देखील गंडवणार अश्या आषयाची एक पोस्ट थोबाडपुस्तकावर (फेसबुक) लीहीली होती.) ती त्यांनी पाहीली असावी त्यांमुळे कदाचीत त्याचाच राग त्यांना आला असावा?
मी त्यांना अगदी शांतपणे ESBC आणि SEBC या दोन्हीमधील साम्य सांगण्याचा प्रयत्न केला असता महाशय जरा जास्तच नाराज झाले आणि म्हणाले, तुमचा सरकारवर कसा भरोसा आसल,तुम्ही शिवाजीचे मराठे”(महाराजांचा मी कधी एकेरी उल्लेख करत नाही पण त्यांच्या बोलण्यातली रग समजावी म्हणुन मी जशास तसं लीहीत आहे.एकेरी उल्लेखा बद्दल क्षमा असावी.) खर तर त्यांच्या या उध्दट आणि बालीश पण हस्यास्पद उत्तराने मला हसायला झाले.वरून त्यांनी मलाच समजवणुकीच्या सुरात आमुक या जातीच्याच मुख्यमत्र्यानी आरक्षण दिले की नाही.जसं पुजापाठाला तेच लागतात तसे आरक्षण पण त्यांच्याच हाताने मिळाले म्हणत त्यांनी पुन्हा एकदा स्वत:चीच पाठ थोपटावुन घेतली आणि दुरचित्रवाणीतील भगवा फेटा बांधुन एकमेकांच्या तोंडात गोळा कोंबणारे पाढरे लोकं’ (ग्रामीण भाषेत पांढरे म्हणजे अपशकुनी पण इथे त्यांचे कपडे तसे होते म्हणुन हा शब्दप्रयोग,बाकी ते कसे आहेत हे आपण सर्व जाणता.) पाहण्यात दंग झाले.
तेवढ्यात एक जाकीट घातलेल्या फुग्यासारखा जाडजुड माणुस (जाकीट घातलेला फुगा हा शब्द राज ठाकरे यांच्या भाषणातुन ऐकलेला आहे याची नोंद घ्यावी.) मराठ्यांनो जल्लोष करा असे घसा कोरडा पडेपर्यंत हात वर करून (बोंबलत सुटला असं म्हणायच आहे पण...) बरळत सुटला आणि महाशय आणखीनच उत्साहात आले.त्याच उत्साहात त्यांची माझी नजरा नजर झाली आणि त्यांनी मला सेलीब्रेशन करण्याचा सल्ला दिला. तेव्हा मी त्यांना माझ्या त्या आरक्षणाच्या नावावर गंडवण्याच्या फेसबुक पोस्टचा स्क्रीनशॉट काढुण ठेवण्याचे सुचवणार तीतक्यात माझा मोबाइल वाजला म्हणुन पाहीले तर वॉट्सअपवर एका मित्राने मुंगीला लीप्स्टीक लावणे,गाढवाला उकांडयावर आणि डुकराला गटारात लोळु नको सांगणे आणि भक्ताला समजावुन सांगणे यातील साम्य सांगणारा संदेश पाठवीला होतातो संदेश वाचुन मी मनातल्या मनात हसत त्या महाशयांकडे दुर्लक्ष करून सरळ घराच्या दिशेने निघुण आलो.
          आता कालपासुन ते महाशय जरा बेचैन दिसत आहेत. काय कराव काय नाही ते कदाचीत सुचत नसावं म्हणुनच की काय समोरून जाताना नजरेला नजरच देत नाहीत.असो, मोठ्यांचा आदर करणे हे आपले संस्कार बाकी ते आणि त्यांची भक्ती त्यांनाच लाखलाभ.यावरून मी मात्र खुप काही शिकलो एकतर भक्तांना समजावुन सांगण्यात वेळ घालवु नये. त्यांना तर्क वितर्काशी काही देण घेण नसतं. ते एकअंगी विचारसरणीचे असतात.कीतीही काहीही झाले तरी स्वत:चीच लाल करून घेण्यात त्यांचा हात कोणीच धरू शकत नाही. हा माझा अनुभव तुम्हाला आवडला तर नक्कीच शेअर करा आणि तुमचे अनुभव असतील तर नक्कीच शब्दबध्द करण्याचा प्रयत्न करा.

तुमचाच :-  सरकारवर भरोसा नसणारा गणु, मो.नं. 9552059143

Comments

Popular posts from this blog

कुरूप बदकाचं पिल्लु?

निसर्ग आपला सखा