Posts

Showing posts from 2019

स्वराज्याचे खरे शत्रु कोण?

Image

कुरूप बदकाचं पिल्लु?

Image
परवाच दहावीचा निकाल जाहीर झाला.अनेकजण भरघोस टक्के मार्क घेऊन पास झाले. त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. त्यांनी मिळविलेल्या यशा बद्दल त्यांचे कौतुक व्हायलाच हवे ! यात दुमत नाही मात्र याचवेळी कमी मार्क घेणारांना घरच्यांसह शेजाऱ्यांचे व पाहुण्यांचे टोमणे सहन करावे लागत आहेत. या टोमण्यांमुळे मात्र या विद्यार्थ्यांची पुरती पंचायत होत आहे.टक्केवारी चांगली आहे पण त्याच्या किंवा तिच्या एवढी का नाही म्हणुन पालक मुला-मुलींना दुखावत असल्याने कित्येक विद्यार्थी स्वत : ला कोसताना पहावयास मिळत आहेत.मला या सर्व विद्यार्थ्यांना एक गोष्ट सांगायची आहे.ती गोष्ट आहे एका कुरूप बदकाच्या पिलाची.             एका बदकाला चार पिल्लं होतात त्यातील तीन पिलं अगदी छान दिसत असतात, मात्र चौथे पिल्लु जरा कुरूप दिसत असते.ते कुरूप दिसत असल्यामुळे त्याची तीन्ही भावंड त्याला कुरूप म्हणुन चिडवत असतात. खेळायला जायचे असल्यास ते भावंड त्याला सोबत घेत नसत व त्याला दिसण्यावरून त्याला सतत चिडवत असत. त्यांचे पाहुन इतर प्राणी देखील त्या पिलाला चिडवायला लागतात. त्यांच्या त्या   चिडवण्यामुळे ते पिल्लु पुरतं खचुन जातं.

माणसं असे का वागत असतील?

या पृथ्वीवर अनेक जीव आहेत त्यापैकी मानव हा सर्वात प्रगत आणि हुशार असा जीव आहे. माणुस हा खुप विचीत्र प्राणी आहे. माणसांचे त्यांच्या वागण्यावरून अनेक प्रकार पडतात काही माणसे खुप कडक शिस्तीचे असतात, काही बिन्‍दास असतात तर काही खुप खडुस असतात, काही अगदी मायाळु स्वभावाची तर काही कपटी आणि कारस्थानी स्वभावाचे असतात. मला यातील जवळपास सर्व प्रकारची मानसे भेटली.खुप वेळा माझे त्यांच्याशी जमले नाही,कधी त्यांचे वागणे मला तर कधी माझे वागणे त्यांना खटकत असे परंतु जेव्हा-जेव्हा समोरा समोर येऊन बोलत असु तेव्हा मात्र मणात कसलाही मळ न राखता अगदी झाल गेलं विसरून कुठलाही आकस न ठेवता आम्ही पुन्हा कामाला लागलो.   मात्र वरील प्रकारातील कपटी आणि कारस्थानी लोक हे कायम असमाधानीच राहीलेली मी पाहीतले आहेत. खर तर या लोकांना इतरांचे चांगले झालेले खपत नाही. यांना इतरांची प्रगती देखवत नाही यांच्या कायम पोटात दुखत असते. यांच्या इच्छा कधीही पुर्ण होत नाहीत. या प्रकारातील माणसे सतत इतरांना त्रास देण्याच्या नव-नवीन युक्त्या शोधत असतात. या प्राकारातील माणसं म्हणजे निचपणाचा कळस असतात. हे कधी कुठल्या थराला जातील याचा का

“पाणी आलं रे गणु”

आज पुन्हा एकदा एक निरीक्षण घेऊन आलो आहे, प्रसंग तसा नवीन किंवा अनोळखी नाही. साधारण सायंकाळचे पाच वाजले असतील माझा फोन खणाणला पलीकडुन आवाज आला, “ पाणी येणार आहे लवकर घरी ये .” फोनवर माझे वडील होते.गेली पंधरा ते विस दिवस झालं डोळयात पाणी आणुन आम्ही पाण्याची वाट पाहत होतो.आज पाणी येणार म्हणुन मी ऑफीसातली सर्व कामे टाकुण पटकन धावत घराच्या दिशेने निघालो.घाई गडबडीत घराकडे निघालो असल्याने रस्त्याने होत असलेल्या गोंगाट आणि गोंधळाकडे माझं फारसं लक्ष नव्हत घरापर्यंत पोहोचलोच होतो तेवढ्यात आमच्या शेजारी राहणाऱ्या राधा मावशीच्या घरासमोर थोडीशी गर्दी दिसली तसे पाणी आल्यानंतर घरासमोर गर्दी म्हणजे पाणी पाहीजे असेल म्हणुन आले असतील असं मला वाटलं, पण जवळ जाताच गर्दीतुन आवाज आला “ मोटर बंद करा आगोदर ” हो सद्या आमच्या गावात पाण्याचा प्रश्न अगदीच गंभीर झाला आहे.काल पाणी आले पिण्याचा माठ भरतो न भरतो तोच नळाने नटखटपणे गुळण्या मारायला सुरू केले, ते पाहुण रांजणी तर लगेचच रूसुबाइर रूसु म्हणत कोपऱ्यात जाऊन बसली ते थेट आजच तीचा रूसवा काढण्याचा योग आला होता.त्यात राधा मावशीच्या घरी उद्या कार्यक्रम म्हणुन जास्त

गणु, तुझा सरकारवर भरोसा न्हाय काय?

‍विशेष सुचना : ज्यांना विनोदी भाषा कळत नाही त्यांनी लेख नाही वाचला तरी चालेल.विशेष करून भक्तांनी. साधारण सायंकाळच्या पाच वाजेची वेळ असेल, मी ऑफीसातलं काम संपवुन घराच्या दिशेने चाललो होतो तेव्हा बाजुच्या दुकानातुन अचानक माझ्या नावाने आरोळी आली.अचानक आलेली आरोळी ऐकुन मी मागे पाहीले तर ती आरोळी माझ्याच एका नातेवाइकाने दिली होती.कधी जास्त न बोलणारे म्हणुन मी त्यांच्या हाकेला ओ देत रस्त्याच्या बाजुलाच असणाऱ्या एका दुकानात जेथे ते बसले होते तीथे गेलो. मी काही बोलण्याच्या आत त्यांनी “ सरकारवर भरोसा नाही का ?” असा प्रश्न मला विचारला.हा प्रश्न त्यांनी मलाच का विचारला या गोष्टीचा अंदाज मला लगेचच लागला ( कारण थोडयाच वेळार्वी राज्यातील सरकारने मराठा आरक्षणाचे विधेयक कसलाही आक्षेप न घेता एकमताने संमत केले होते. त्याचाच सोहळा ते त्या दुकानातील दुरचित्रवाणीवर बघत बसले होते आणि शेवटी याच सरकारने मराठा आरक्षण दिले की नाही म्हणत टिऱ्या बडवीत वाहवा लुटत होते.त्यावर मी मागील सरकारने गंडवले हे देखील गंडवणार अश्या आषयाची एक पोस्ट थोबाडपुस्तकावर ( फेसबुक ) लीहीली होती. ) ती त्यांनी पाहीली असावी त्या

व्हाट इज लव?

Image
प्रेम म्हणजे काय ? खर तर आजच्या या बॉलीवुडच्या जमान्यात हा प्रश्न विचारणे   म्हणजे अज्ञानाचे लक्षण ठरेल पण खरे प्रेम म्हणजे काय असं विचारल तर.... तर मात्र बरेच जण गोंधळात पडतील कारण प्रत्येकाची आपआपली वेगवेगळी प्रेमाची व्याख्या आहे.कुणी काळजी घेण्याला प्रेम समजत तर कुणी काळजी करण्याला प्रेम समजतं.कोणी आकर्षणाला प्रेम समजतं तर कोणी आवडण्याला प्रेम समजुन बसतात तर काहीजण भलत्याच प्रकाराला प्रेम म्हणतात. आवड आणि प्रेम या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत.एखादी व्यक्ती आवडल्यानंतरच प्रेम होत हे जरी खर असलं तरी आवड आणि प्रेम वेगवेगळेच कारण चित्रपटातल्या नट-नटया आपल्याला आवडत असले तरी ते एक आकर्षण असतं जे प्रत्येकाला आहे.हल्लीच्या जमान्यात प्रेम सुध्दा मॅगी सारख झालं आहे.पाच मिनीटांत प्रेम होतं आणि आठवडयात संपत देखील मग हे खरं प्रेम झालं का.खरं प्रेम कुठुन येत त्यात काय म्हत्वाच असतं . बाह्य सौंदर्य ? आईच प्रेम बघा कस असतं एखाद्या आईचं बाळ कुरूप जरी असलं तरी त्या आईला ते प्रिय असतं ती आई त्या बाळाला टाकुण देत नाही उलट ती त्याची जास्त काळजी घेते.त्याला प्रत्येक गोष्टीत विश्वास देते.त्याच्या