Posts

Showing posts from May, 2019

माणसं असे का वागत असतील?

या पृथ्वीवर अनेक जीव आहेत त्यापैकी मानव हा सर्वात प्रगत आणि हुशार असा जीव आहे. माणुस हा खुप विचीत्र प्राणी आहे. माणसांचे त्यांच्या वागण्यावरून अनेक प्रकार पडतात काही माणसे खुप कडक शिस्तीचे असतात, काही बिन्‍दास असतात तर काही खुप खडुस असतात, काही अगदी मायाळु स्वभावाची तर काही कपटी आणि कारस्थानी स्वभावाचे असतात. मला यातील जवळपास सर्व प्रकारची मानसे भेटली.खुप वेळा माझे त्यांच्याशी जमले नाही,कधी त्यांचे वागणे मला तर कधी माझे वागणे त्यांना खटकत असे परंतु जेव्हा-जेव्हा समोरा समोर येऊन बोलत असु तेव्हा मात्र मणात कसलाही मळ न राखता अगदी झाल गेलं विसरून कुठलाही आकस न ठेवता आम्ही पुन्हा कामाला लागलो.   मात्र वरील प्रकारातील कपटी आणि कारस्थानी लोक हे कायम असमाधानीच राहीलेली मी पाहीतले आहेत. खर तर या लोकांना इतरांचे चांगले झालेले खपत नाही. यांना इतरांची प्रगती देखवत नाही यांच्या कायम पोटात दुखत असते. यांच्या इच्छा कधीही पुर्ण होत नाहीत. या प्रकारातील माणसे सतत इतरांना त्रास देण्याच्या नव-नवीन युक्त्या शोधत असतात. या प्राकारातील माणसं म्हणजे निचपणाचा कळस असतात. हे कधी कुठल्या थराला जातील याचा का

“पाणी आलं रे गणु”

आज पुन्हा एकदा एक निरीक्षण घेऊन आलो आहे, प्रसंग तसा नवीन किंवा अनोळखी नाही. साधारण सायंकाळचे पाच वाजले असतील माझा फोन खणाणला पलीकडुन आवाज आला, “ पाणी येणार आहे लवकर घरी ये .” फोनवर माझे वडील होते.गेली पंधरा ते विस दिवस झालं डोळयात पाणी आणुन आम्ही पाण्याची वाट पाहत होतो.आज पाणी येणार म्हणुन मी ऑफीसातली सर्व कामे टाकुण पटकन धावत घराच्या दिशेने निघालो.घाई गडबडीत घराकडे निघालो असल्याने रस्त्याने होत असलेल्या गोंगाट आणि गोंधळाकडे माझं फारसं लक्ष नव्हत घरापर्यंत पोहोचलोच होतो तेवढ्यात आमच्या शेजारी राहणाऱ्या राधा मावशीच्या घरासमोर थोडीशी गर्दी दिसली तसे पाणी आल्यानंतर घरासमोर गर्दी म्हणजे पाणी पाहीजे असेल म्हणुन आले असतील असं मला वाटलं, पण जवळ जाताच गर्दीतुन आवाज आला “ मोटर बंद करा आगोदर ” हो सद्या आमच्या गावात पाण्याचा प्रश्न अगदीच गंभीर झाला आहे.काल पाणी आले पिण्याचा माठ भरतो न भरतो तोच नळाने नटखटपणे गुळण्या मारायला सुरू केले, ते पाहुण रांजणी तर लगेचच रूसुबाइर रूसु म्हणत कोपऱ्यात जाऊन बसली ते थेट आजच तीचा रूसवा काढण्याचा योग आला होता.त्यात राधा मावशीच्या घरी उद्या कार्यक्रम म्हणुन जास्त

गणु, तुझा सरकारवर भरोसा न्हाय काय?

‍विशेष सुचना : ज्यांना विनोदी भाषा कळत नाही त्यांनी लेख नाही वाचला तरी चालेल.विशेष करून भक्तांनी. साधारण सायंकाळच्या पाच वाजेची वेळ असेल, मी ऑफीसातलं काम संपवुन घराच्या दिशेने चाललो होतो तेव्हा बाजुच्या दुकानातुन अचानक माझ्या नावाने आरोळी आली.अचानक आलेली आरोळी ऐकुन मी मागे पाहीले तर ती आरोळी माझ्याच एका नातेवाइकाने दिली होती.कधी जास्त न बोलणारे म्हणुन मी त्यांच्या हाकेला ओ देत रस्त्याच्या बाजुलाच असणाऱ्या एका दुकानात जेथे ते बसले होते तीथे गेलो. मी काही बोलण्याच्या आत त्यांनी “ सरकारवर भरोसा नाही का ?” असा प्रश्न मला विचारला.हा प्रश्न त्यांनी मलाच का विचारला या गोष्टीचा अंदाज मला लगेचच लागला ( कारण थोडयाच वेळार्वी राज्यातील सरकारने मराठा आरक्षणाचे विधेयक कसलाही आक्षेप न घेता एकमताने संमत केले होते. त्याचाच सोहळा ते त्या दुकानातील दुरचित्रवाणीवर बघत बसले होते आणि शेवटी याच सरकारने मराठा आरक्षण दिले की नाही म्हणत टिऱ्या बडवीत वाहवा लुटत होते.त्यावर मी मागील सरकारने गंडवले हे देखील गंडवणार अश्या आषयाची एक पोस्ट थोबाडपुस्तकावर ( फेसबुक ) लीहीली होती. ) ती त्यांनी पाहीली असावी त्या