Posts

Showing posts from June, 2018

अपयश नव्हे ते यशच

Image
परवा दिवशी वर्तमान पत्र उघडल पाहतो तर काय? अगदी पहील्याच पानावर परिक्षेत मार्क कमी मिळाले म्हणुन विद्यार्थ्याची आत्महत्या अशी ठळक अक्षरातील बातमी दिसली.केवळ परिक्षेत कमी गुण मिळाले म्हणुन निराश होऊन जिवन संपवले वाचुन खुप वाईट वाटले.आणि मनात विचार आला की,आजच्या ह्या एकविसाव्या शतकातील हे मुलं एवढया कमकुवत मानसिकतेचे कसे असतील आणि यांचे 10 वी 12 वी मार्क यांचे आयुष्य ठरवणार आहेत का? या मुलांवर विनाकारण दबाव आणनारे कोण तर त्यांचेच पालक आणि नातेवाईक कारण तेच फोन करून सांगतात ना आमच्या भैय्याला 98 टक्के पडले तुमच्या भैय्याला किती पडले? आपण देखील आपल्या मुलाला टोमने मारायला सुरू करतो त्याला 98 पडले तुच कसा असा मुर्ख निघाला.बर मला हे सांगा तो 98 वाला जिवनाच्या परिक्षेत पास होईल का? मी कित्येक मुलांना पालकांच्या अपेक्षांच्या ओझ्याखाली दबलेल पाहील आहे.अशी मुल जगण विसरत चालली आहेत.ती एकलकोंडी होत आहेत.जगण्यातला निखळ आनंद त्यांच्या वाट्याला येत नाहीये.अगोदर त्यांना मोकळा श्वास घेऊ द्या.त्यांना भरपुर जगु द्या, त्यांच्याशी गप्पा मारा, त्यांना काय आवडत काय नाही ते बघा.अन्यथा अशी मुल केवळ पालकांच