Posts

Showing posts from 2018

"ये सूरत बदलनी चाहिए"

आपण भारतीय म्हणजे शांत,संयमी आणि मायाळु लोकं.आपला भावनांक नेहमी बुध्यांकावर मात करत असल्यामुळे अपण बऱ्याचवेळा लोकांच्या खोट्या बोलण्याला देखील बळी पडतो.म्हणुनच आपण नेहमी आपल्या देशातील नेत्यांच्या आश्वासनांवर विश्वास ठेऊन प्रत्येक वेळा त्यांना निवडुन देत असतो आणि नेहमी फसत असतो पण पुन्हा आपल्याला कोणीतरी भावनीक साथ घालत येत आपल्याला पुन्हा फसवत. आपण समजतो आज नाहीतर उद्या तरी हा आपले काम करेल या वेड्या आशेपोटी आपण या भामट्या मंडळींच्या आहारी जाऊन नकळत त्यांच्या सारखे निर्दयी होऊन जातो हे आपले आपल्याला कळत नाही.त्यातली त्यात आज तर निर्दयीपणाची स्पर्धाच लागली की काय असे वाटायला लागले आहे ; कारण आपल्या देशात आणि शहरात अशा काही घटना घडत आहेत ज्यांच्यामुळे आपल्यात माणुसकी आणि प्रेम नावाचे काही गुण शिल्ल्क आहेत की नाही यावर प्रश्न उपस्थित करावासा वाटतो.           खुप दिवसांपुर्वीच्या नाही अगदी या आठवडयातील काही घटना पाहल्या तर आपणास देखील या गोष्टीचा प्रत्यय येईल.काल परवा सोशल मिडीयावर एक पोस्ट फिरत होती,युपी मधल्या एका अल्पवयीन मुलीस जिवंत जाळले.तोसीफ शेख नामक एका मुस्लीम व्यक्तीने अन

"सोशल मिडीयाचा असाही वापर "

Image
फेसबुक 2004 साली उदयास आलेल एक सोशल मीडीया ( समाज माध्यम ) हे माध्यम “ फ्रेंड ऑफ फ्रेंड ” या प्रकारातील असल्यामुळे यावर तुम्ही काही   लीहील अथवा अपलोड केल की ते तुमच्या मित्रांना तर दिसतच त्याचबरोबर तुमच्या मित्रांच्या मित्रांना देखील दिसत ज्यांना तुम्ही ओळखत देखील नसता मग ते देखील त्यावर त्यांची आवड अथवा प्रतीक्रीया देऊ शकतात आणि तुम्ही नविन मित्र जोडु शकता याच वैशिष्ट्यामुळे हे माध्यम इतक्या कमी कालावधीत एवढ प्रचंड लोकप्रिय झाले की असे अनेक समाज माध्यम उदयास आली ती देखील लोकप्रिय झाली परंतु फेसबुकच्या लोकप्रीयतेत तसुभरही कमतरता आली नाही.सद्य स्थितीत फेसबुकची कार्यरत वापरकर्ता संख्या 2 अब्जाहुनही अधिक आहे तर जगाची एकुण लोकसंख्या 7.3 अब्ज असल्याची समजते यावरून या समाज माध्यमाच्या लोकप्रियतेचा अंदाज लावता येवु शकेल.           फेसबुकच्या सुरूवातीचा काळातील वापर म्हणजे जुने मित्र / मैत्रीण शोधणे व त्यांच्याशी गप्पा मारणे हा होता परंतु जसजशी इंटरनेट क्रांती होत गेली शहरातील इंटरनेट खेडोपाडी आणि गल्लोगल्ली चालायला लागल तसतशी सामान्यातील सामान्य पोर देखील मोबाईलमध्ये मुंडक घालुन इ

अपयश नव्हे ते यशच

Image
परवा दिवशी वर्तमान पत्र उघडल पाहतो तर काय? अगदी पहील्याच पानावर परिक्षेत मार्क कमी मिळाले म्हणुन विद्यार्थ्याची आत्महत्या अशी ठळक अक्षरातील बातमी दिसली.केवळ परिक्षेत कमी गुण मिळाले म्हणुन निराश होऊन जिवन संपवले वाचुन खुप वाईट वाटले.आणि मनात विचार आला की,आजच्या ह्या एकविसाव्या शतकातील हे मुलं एवढया कमकुवत मानसिकतेचे कसे असतील आणि यांचे 10 वी 12 वी मार्क यांचे आयुष्य ठरवणार आहेत का? या मुलांवर विनाकारण दबाव आणनारे कोण तर त्यांचेच पालक आणि नातेवाईक कारण तेच फोन करून सांगतात ना आमच्या भैय्याला 98 टक्के पडले तुमच्या भैय्याला किती पडले? आपण देखील आपल्या मुलाला टोमने मारायला सुरू करतो त्याला 98 पडले तुच कसा असा मुर्ख निघाला.बर मला हे सांगा तो 98 वाला जिवनाच्या परिक्षेत पास होईल का? मी कित्येक मुलांना पालकांच्या अपेक्षांच्या ओझ्याखाली दबलेल पाहील आहे.अशी मुल जगण विसरत चालली आहेत.ती एकलकोंडी होत आहेत.जगण्यातला निखळ आनंद त्यांच्या वाट्याला येत नाहीये.अगोदर त्यांना मोकळा श्वास घेऊ द्या.त्यांना भरपुर जगु द्या, त्यांच्याशी गप्पा मारा, त्यांना काय आवडत काय नाही ते बघा.अन्यथा अशी मुल केवळ पालकांच

सोशल मीडिया

Image
सोशल मीडीया आज सकाळी सहज वॉट्सअप उघडले अन पाहतो तर काय? अगदी मोबाईल हँग व्हावा एवढे मॅसेज एकानंतर एक येऊन धडकायला सुरूवात झाली.थोडावेळ नुसते बघतच रहावे लागले आणि मग कुठे संदेश ऊघडायला सुरूवात झाली.मी एक-एक संदेश पाहत होतो त्यात शुभ सकाळ,शुभ,दुपार,शुभ रात्री,हा संदेश अकरा जणांना पाठवा........सह अनेक संदेश होते.एका मित्राने पाठवलेला छानसा संदेश वाचला व त्याचे अभिनंदन केले.एवढे चांगले संदेश सुचतात कसे असा प्रश्न मी त्याला करताच त्याचा रिप्लाय आला ‘गुगल प्ले स्टोर’ वर सर्व ॲप्स मिळतात.त्यामध्ये सर्व प्रकारचे संदेश असतात.तोपर्यंत काही मित्रांनी त्या संदेशाला दाद द्यायला सुरूवात केली होती. त्याने मला एका ॲप्लीकेशनची लींक पाठवली मी सहज उघडुन पाहीतली पाहतो तर काय त्यामध्ये सर्व प्रकारचे संदेश अगदी यादी करून तयार होते.केवळ कॉपी करा आणि हवे तेथे पोस्ट करा.सुविचार,वैचारीक,गुड मॉर्निंग,गुड नाईट,हॅपी बर्थ डे,शुभेच्छा संदेश,दुख संदेश इ.अनेक प्रकारचे संदेश त्यात अगदी तयार होते.मग मला प्रश्न पडला या रेडीमेड संदेशाने मानसाच्या भावना माणसापर्यंत पोहोचत असतील का? यामध्ये आजची तरूण पीढी गुरफटत तर चालली न

पिंपळनेर तालुका निर्मीती बद्दल माझे मत

Image
पिंपळनेर तालुकानिर्मीतीबद्दल माझे मत... गणेश इंगोले पिंपळनेर मो. ९५६१४३०६७१ पिंपळनेर सर्कल म्हटल की मला आठवतं ते इथल्या जेष्ठ नागरीकांनी सांगीतलेल व वर्तमान पत्रातुन वाचलेल कधी काळी गल्ली ते दिल्ली सत्तेची फळे चाखणार पिंपळनेर,पण आज जर या गावाकडे पाहीतल तर गावाचा जो विकास व्हायला पाहीजे होता तेवढ्या प्रमाणात झाला नाही.आज या गावाची अवस्था त्या बैलासारखी झाली आहे जो आयुष्यभर मालकाच्या शेतात राब-राब राबतो अन मालक त्याला त्याच्या म्हातारपणी खाटकाला विकतो.कारण जर निरीक्षण केल तर अस लक्षात येईल की या गावातील बहुतांश लोक हे बाहेरून आलेले आहेत.बाहेरून येऊन इथे व्यवसाय,शेती करणारे या लोकांना देखील या गावाने भरभरून दिले आहे.मात्र आता वेळ आली आहे आपण या गावाला काही देण्याची या गावाचा विकासाचा अनुशेष भरून काढण्याची विकासाचा अनुशेष जर कशाने भरुन निघणार असेल तर याच उत्तर कदाचीत तालुका निर्मीतीच्या प्रश्नात दडलेल असाव.म्हणुन या गावातुन व सर्कल मधुन मोठ्या प्रमाणत या प्रश्नावर सक्रीय होण्यची आणि लोकअंदोलन उभारण्याची गरज आज भासताना दिसुन येत आहे.   काल परवा वर्तमान पत्रात वाचल अंबेजोगाई जिल्