Posts

Showing posts from August, 2020

बीडचा गर्दीतला कोरोना प्रवास

बीड शहर दहा दिवस बंद राहणार असल्याने मित्र योगेश नरवडे यांच्यासोबत मी आज कृषी दुकानाचा माल खरेदी करण्यासाठी शहराकडे निघालो होतो. शहराच्या जवळ आलोच ह़ोतो की पावसाने चाल केली. तांड्यावर चिलट्या (भुरभुर) पाऊस सुरू झाल्याने गाडी मागे वळुन निवारा शोधण्याचा अंदाज लागताच मी पुढे उड्डाण पुलाखाली थांबता येईल म्हणुन गाडी तशीच दामटायला लावली. शे-दोनशे मिटर पुढे आलो की लगेच पाऊस बंद झाला. कदाचित त्याला शहरात जाणाऱ्या माणसांना भीजवण्यात आनंद वाटत असावा. तसेही आजकाल मुद्दामहून कोणी पावसात मनसोक्त भिजताना दिसत नाही. म्हणुन हा निसर्गाचा प्रयत्न असावा. असो. शहरात प्रवेश करताच मोंढ्याकडे जाणाऱ्या खोदुन ठेवलेल्या रस्त्यातील छोट्या-छोट्या स्विमींग पुलातून रस्ता शोधत आणि आपल्याच देशातील मातीचा सुगंधित चिखल श्री कृष्ण जन्माष्टमीच्या मुहुर्तावर राधा-कृष्णाने रंगपंचमी खेळावी तशी पण एकमेकांच्या अंगावर जाऊन नस्ती भांडणं होणार नाही अशा रीतीने उडवत निघालो होतो. पुढे वाहनं ऊभी दिसताच शहर बंद राहणार म्हणुन आज गर्दी थोडी जास्तच असावी असे मनातल्या मनात ठरवत मुंगीच्या पावलांनी पुढे सरकलो तर एक महापुरुष भर रस्त्यावर बं

काम की बात

साधारण एक अठवड्या पुर्वीची गोष्ट आहे. राम मंदिराचे भूमिपूजन होणार म्हणुन सर्वजण उत्साहात होते. ( त्या सर्वात मी पण येतो हे वेगळे सांगायला नको) पण देशातील अनेक रूग्ण कोरोना सारख्या वैश्विक महामारीमुळे व अपुऱ्या वैद्यकीय सेवा- साधनांमुळे  उपचाराअभावी मरण पावत असताना मंदिराचे उद्घाटन करण्यापेक्षा एखाद्या मोठ्या सर्व सोयीयुक्त हॉस्पिटलचे उद्घाटन करणे अपेक्षित होते. (फक्त अपेक्षित होते म्हणतोय मी) असे मी सहजच माझ्या मित्राशी बोलताना म्हणालो.  मित्र तसा थोडा शिक्षीत (थोडाच हा, जास्त नाही) आणि व्यवहारीक दृष्टीने देखील हुशार होता (हा माझा गैरसमज होता) पण त्याने बोलताना सांगायला सुरुवात केली की, बरं झालं राम मंदिराचे भूमिपूजन झाले. कित्येक वर्षांपासून प्रलंबित मुद्दा निकाली लागत आहे (खरंतर आणखी खुप वेळ आहे, दोन टर्मच्या निवडणुका त्यावर पार पडतील) आणि तसेही देशात दवाखान्यांची काही कमी नाही, याचे उदाहरण देताना त्याने गावातील क्लिनीक व शहरातील खाजगी दवाखान्याचे उदाहरण दिले. अर्थात त्याचे म्हणनेही बरोबर होते त्याच्या दृष्टीने. (पण मी मल्टी स्पेशालिटी सरकारी रुग्णालया बाबत बोलत होता हे त्याच्या लक्ष