Posts

Showing posts from December, 2018

"ये सूरत बदलनी चाहिए"

आपण भारतीय म्हणजे शांत,संयमी आणि मायाळु लोकं.आपला भावनांक नेहमी बुध्यांकावर मात करत असल्यामुळे अपण बऱ्याचवेळा लोकांच्या खोट्या बोलण्याला देखील बळी पडतो.म्हणुनच आपण नेहमी आपल्या देशातील नेत्यांच्या आश्वासनांवर विश्वास ठेऊन प्रत्येक वेळा त्यांना निवडुन देत असतो आणि नेहमी फसत असतो पण पुन्हा आपल्याला कोणीतरी भावनीक साथ घालत येत आपल्याला पुन्हा फसवत. आपण समजतो आज नाहीतर उद्या तरी हा आपले काम करेल या वेड्या आशेपोटी आपण या भामट्या मंडळींच्या आहारी जाऊन नकळत त्यांच्या सारखे निर्दयी होऊन जातो हे आपले आपल्याला कळत नाही.त्यातली त्यात आज तर निर्दयीपणाची स्पर्धाच लागली की काय असे वाटायला लागले आहे ; कारण आपल्या देशात आणि शहरात अशा काही घटना घडत आहेत ज्यांच्यामुळे आपल्यात माणुसकी आणि प्रेम नावाचे काही गुण शिल्ल्क आहेत की नाही यावर प्रश्न उपस्थित करावासा वाटतो.           खुप दिवसांपुर्वीच्या नाही अगदी या आठवडयातील काही घटना पाहल्या तर आपणास देखील या गोष्टीचा प्रत्यय येईल.काल परवा सोशल मिडीयावर एक पोस्ट फिरत होती,युपी मधल्या एका अल्पवयीन मुलीस जिवंत जाळले.तोसीफ शेख नामक एका मुस्लीम व्यक्तीने अन