Posts

Showing posts from March, 2018

सोशल मीडिया

Image
सोशल मीडीया आज सकाळी सहज वॉट्सअप उघडले अन पाहतो तर काय? अगदी मोबाईल हँग व्हावा एवढे मॅसेज एकानंतर एक येऊन धडकायला सुरूवात झाली.थोडावेळ नुसते बघतच रहावे लागले आणि मग कुठे संदेश ऊघडायला सुरूवात झाली.मी एक-एक संदेश पाहत होतो त्यात शुभ सकाळ,शुभ,दुपार,शुभ रात्री,हा संदेश अकरा जणांना पाठवा........सह अनेक संदेश होते.एका मित्राने पाठवलेला छानसा संदेश वाचला व त्याचे अभिनंदन केले.एवढे चांगले संदेश सुचतात कसे असा प्रश्न मी त्याला करताच त्याचा रिप्लाय आला ‘गुगल प्ले स्टोर’ वर सर्व ॲप्स मिळतात.त्यामध्ये सर्व प्रकारचे संदेश असतात.तोपर्यंत काही मित्रांनी त्या संदेशाला दाद द्यायला सुरूवात केली होती. त्याने मला एका ॲप्लीकेशनची लींक पाठवली मी सहज उघडुन पाहीतली पाहतो तर काय त्यामध्ये सर्व प्रकारचे संदेश अगदी यादी करून तयार होते.केवळ कॉपी करा आणि हवे तेथे पोस्ट करा.सुविचार,वैचारीक,गुड मॉर्निंग,गुड नाईट,हॅपी बर्थ डे,शुभेच्छा संदेश,दुख संदेश इ.अनेक प्रकारचे संदेश त्यात अगदी तयार होते.मग मला प्रश्न पडला या रेडीमेड संदेशाने मानसाच्या भावना माणसापर्यंत पोहोचत असतील का? यामध्ये आजची तरूण पीढी गुरफटत तर चालली न

पिंपळनेर तालुका निर्मीती बद्दल माझे मत

Image
पिंपळनेर तालुकानिर्मीतीबद्दल माझे मत... गणेश इंगोले पिंपळनेर मो. ९५६१४३०६७१ पिंपळनेर सर्कल म्हटल की मला आठवतं ते इथल्या जेष्ठ नागरीकांनी सांगीतलेल व वर्तमान पत्रातुन वाचलेल कधी काळी गल्ली ते दिल्ली सत्तेची फळे चाखणार पिंपळनेर,पण आज जर या गावाकडे पाहीतल तर गावाचा जो विकास व्हायला पाहीजे होता तेवढ्या प्रमाणात झाला नाही.आज या गावाची अवस्था त्या बैलासारखी झाली आहे जो आयुष्यभर मालकाच्या शेतात राब-राब राबतो अन मालक त्याला त्याच्या म्हातारपणी खाटकाला विकतो.कारण जर निरीक्षण केल तर अस लक्षात येईल की या गावातील बहुतांश लोक हे बाहेरून आलेले आहेत.बाहेरून येऊन इथे व्यवसाय,शेती करणारे या लोकांना देखील या गावाने भरभरून दिले आहे.मात्र आता वेळ आली आहे आपण या गावाला काही देण्याची या गावाचा विकासाचा अनुशेष भरून काढण्याची विकासाचा अनुशेष जर कशाने भरुन निघणार असेल तर याच उत्तर कदाचीत तालुका निर्मीतीच्या प्रश्नात दडलेल असाव.म्हणुन या गावातुन व सर्कल मधुन मोठ्या प्रमाणत या प्रश्नावर सक्रीय होण्यची आणि लोकअंदोलन उभारण्याची गरज आज भासताना दिसुन येत आहे.   काल परवा वर्तमान पत्रात वाचल अंबेजोगाई जिल्