व्हाट इज लव?


प्रेम म्हणजे काय? खर तर आजच्या या बॉलीवुडच्या जमान्यात हा प्रश्न विचारणे  म्हणजे अज्ञानाचे लक्षण ठरेल पण खरे प्रेम म्हणजे काय असं विचारल तर.... तर मात्र बरेच जण गोंधळात पडतील कारण प्रत्येकाची आपआपली वेगवेगळी प्रेमाची व्याख्या आहे.कुणी काळजी घेण्याला प्रेम समजत तर कुणी काळजी करण्याला प्रेम समजतं.कोणी आकर्षणाला प्रेम समजतं तर कोणी आवडण्याला प्रेम समजुन बसतात तर काहीजण भलत्याच प्रकाराला प्रेम म्हणतात.
आवड आणि प्रेम या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत.एखादी व्यक्ती आवडल्यानंतरच प्रेम होत हे जरी खर असलं तरी आवड आणि प्रेम वेगवेगळेच कारण चित्रपटातल्या नट-नटया आपल्याला आवडत असले तरी ते एक आकर्षण असतं जे प्रत्येकाला आहे.हल्लीच्या जमान्यात प्रेम सुध्दा मॅगी सारख झालं आहे.पाच मिनीटांत प्रेम होतं आणि आठवडयात संपत देखील मग हे खरं प्रेम झालं का.खरं प्रेम कुठुन येत त्यात काय म्हत्वाच असतं. बाह्य सौंदर्य?
आईच प्रेम बघा कस असतं एखाद्या आईचं बाळ कुरूप जरी असलं तरी त्या आईला ते प्रिय असतं ती आई त्या बाळाला टाकुण देत नाही उलट ती त्याची जास्त काळजी घेते.त्याला प्रत्येक गोष्टीत विश्वास देते.त्याच्या पाठीशी ती खंबीरपणे उभी राहते.कारण जगातल्या प्रत्येक आईल आपला मुलगा राजकुमार आणि मुलगी राजकुमारी पेक्षा कमी नसते.याऊलट जर महाविद्यालयीन प्रेम पाहीतलं तर जी मुलगी जास्त सुंदर अथवा जो मुलगा जास्त स्मार्ट त्यांच्यावर प्रेम करणारे तेवढेच जास्त.पण बऱ्याच वेळा ते प्रेम नसतं तर ते असतं फक्त आकर्षण म्हणुन आईच्या प्रेमाचे वर्णन करताना कवी माधव ज्युलीयन म्हणतात, स्वामी तीन्ही जगाचा आईविना भिकारीआईच प्रेम हे जगात सर्व श्रेष्ठ आहे म्हणुनच म्हणतात फुलात फुल जाईचे,जगात प्रेम आईचे.” कारण आईचे प्रेम हे निस्वार्थ असतं त्यात कुठलीही आपेक्षा नसते ते थेट .हृदयातुन येत आणि हृदयाला भिडत म्हणुन आईच प्रेम हे जगात सर्व श्रेष्ठ प्रेम असतं.
प्रेम निस्वार्थ असाव लागत तर त्याला प्रेम म्हणतात.आज काल आपण पाहतो एखाद्या नेत्याच्या सभेला लाखोची गर्दी असते.स्टेजवरून सांगीतले जाते ही गर्दी आपल्या नेत्यांवर प्रेम करणाऱ्यांची गर्दी आहे.पण प्रत्येक्षात तेथे जमलेल्या प्रत्येकजणाचे त्या नेत्याकडे काही ना काही तरी काम अडलेले असते अथवा करून घ्यायचे असते म्हणुन ते लोकं तेथे जमलेले असतात.म्हणजे येथे प्रेमाचा अर्थ गरज हा होतो.
प्रेम म्हणजे एकमेकांचा एकमेकांवरील विश्वास असतो..प्रेम म्हणजे फक्त आय लव्ह यु हे तीन अक्षर नव्हे तर प्रेम म्हणजे अखंड आयुष्य एकमेकांच्या चुका समजावुन घेऊन एकमेकांना फक्त शारीरीक नव्हे तर माणसीक साथ देणे.आयुष्यातील खडतर प्रसंगी एकमेकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे.लाखो संकटं आली तरी त्या संकटाशी मीळुन मुकाबला करणे.प्रेम म्हणजे अर्ध्यावरती सोडुन जाणे अथवा गरज संपली की फोन कट करणे नव्हे. प्रेम बऱ्याचवेळा अशक्य आहे पण त्या प्रेमाचा आदर आणि कदर करणे हे खरे प्रेम आहे.
हिंदीत एक शेर आहे जो मला खुप आवडला, तो तुमच्या साठी...

अगर इश्क करणा है तो,
जज्बात को एहमियत देना सिखो I
चेहरे से शुरू हुइ मोहब्बत अक्सर
बिस्तर पर खत्म होती है I

Comments

Popular posts from this blog

कुरूप बदकाचं पिल्लु?

निसर्ग आपला सखा