"सोशल मिडीयाचा असाही वापर "


फेसबुक 2004 साली उदयास आलेल एक सोशल मीडीया (समाज माध्यम) हे माध्यम फ्रेंड ऑफ फ्रेंड या प्रकारातील असल्यामुळे यावर तुम्ही काही  लीहील अथवा अपलोड केल की ते तुमच्या मित्रांना तर दिसतच त्याचबरोबर तुमच्या मित्रांच्या मित्रांना देखील दिसत ज्यांना तुम्ही ओळखत देखील नसता मग ते देखील त्यावर त्यांची आवड अथवा प्रतीक्रीया देऊ शकतात आणि तुम्ही नविन मित्र जोडु शकता याच वैशिष्ट्यामुळे हे माध्यम इतक्या कमी कालावधीत एवढ प्रचंड लोकप्रिय झाले की असे अनेक समाज माध्यम उदयास आली ती देखील लोकप्रिय झाली परंतु फेसबुकच्या लोकप्रीयतेत तसुभरही कमतरता आली नाही.सद्य स्थितीत फेसबुकची कार्यरत वापरकर्ता संख्या 2 अब्जाहुनही अधिक आहे तर जगाची एकुण लोकसंख्या 7.3 अब्ज असल्याची समजते यावरून या समाज माध्यमाच्या लोकप्रियतेचा अंदाज लावता येवु शकेल.
          फेसबुकच्या सुरूवातीचा काळातील वापर म्हणजे जुने मित्र / मैत्रीण शोधणे व त्यांच्याशी गप्पा मारणे हा होता परंतु जसजशी इंटरनेट क्रांती होत गेली शहरातील इंटरनेट खेडोपाडी आणि गल्लोगल्ली चालायला लागल तसतशी सामान्यातील सामान्य पोर देखील मोबाईलमध्ये मुंडक घालुन इंटरनेटच्या जगात रमायला लागली.एरवी गावातील पारावर रंगणारी गप्पाची मैफल फेसबुक ग्रुपवर अन कुच्चर वटयारची चर्चा मॅसेंजरवर व्हायला लागली.याच माध्यमामुळे कित्येकांना त्यांचे जुने मित्र / मैत्रीणी तर कित्येकांना हरवलेले बहीण,भाऊ,दुरवर राहणारी नातेवाईक,समविचारी मंडळी अगदी सहज उपलब्ध झाली.मग यातुन अनेक प्रकारच्या चर्चा व्हायला लागल्या.विचारांचे आदान प्रदान वाढले यातुनच काही नवयुवक घडत गेले तर काही बीघडले देखील काहींनी या माध्यमांचा वापर स्वत:ला घडवण्यासाठी केला तर काहीजण आभासी दुनियेत अनोळखी मित्रांच्या साथीने वाहत गेले आणि या समाज माध्यमाचे व्यसन त्यांना जडले ज्यातुन बाहेर पडणे देखील त्यांना अवघड झाले.असे एक ना अनेक फायदे-तोटे या समाज माध्यमाचे आहेत.
          याच परिस्थितीत या सामाजीक माध्यमाचा वापर काही बुध्दीजीवी लोक जाणुन-बुजुण  समाज विघातक घटना घडवण्यासाठी करायला लागले पुर्वी एखादी अफवा पसरन्यासाठी खुप वेळ लागायचा आता मात्र क्षणभरात एखादी अफवा आपल्या पर्यंत येते आपण देखील त्यातील खरे-खोटे न पडताळता दुसऱ्यांना पाठवुन मोकळे होतो.यामुळे ब्लॅकमेलींग,पाळत ठेवणे,समाजात दुफळी निर्माण करणे,दहशतवादी कारवाया करणे,अशांतता पसरवणे,अंधश्रध्दा पसरवणे सामाजीक वातावरणाला बाध्य ठरतील अशा गोष्टी झपाट्याने वाढायला मदत व्हायला लागली अन दोन समाजात वितुष्ट ‍निर्माण करून आपली पोळी भाजणरांना नकळत आपण देखील मदत करायला लागलो.एखादी घटना जेव्हा आपल्या समोर येते तेव्हा आपण त्याच्या पाठीमागील हेतु शोधायला हवा, ही घटना नेमकी याच वेळेस का समोर आली? यातुन काय घडु शकेल? याचा समाज मनावर काय परिणाम होईल? सामाजीक एकतेला ही गोष्ट कितपत फायदेशीर ठरेल? आपण यामधे सहभागी होऊन या गोष्टीला या घटनेला वाढवण्यास मदत करायला हवी का? असे प्रश्न आपण जर स्वत:ला विचारायला शिकलो तर कित्येक वाईट प्रवृत्तींना आपण जागेवरच थांबवायला यशस्वी होऊ.हे सर्व आपण का करायचे आहे असा प्रश्न देखील काहींना पडु शकतो; आपण या देशाचे नागरीक आहोत आपण सुशीक्षीत आहोत सुजाण आहोत तेव्हा आपले कर्तव्य आहे की आपण आपल्या देशात चांगल्यां गोष्टींना साथ द्यायला हवी आपल्या देशातील पोलीस,सैनिक,समाज सेवक,पत्रकार,लेखक,विचारवंत,समाज सुधारक,नेते,शिक्षक,प्राध्याप असे एक ना अनेक लोक आपल योगदान देऊन आपल्या देशाला आणि समाजाला घडवण्याचे कार्य अविरत पणे करत आहेत.कित्येक वेळा त्यांना त्याची किंमत आपला जीव गमावुन चुकवावी लागते उदाहरण घ्यायचे झाले तर कलबुर्गी,दाभोळकर,पानसरे,गौरी लंकेश अशी अनेक मंडळी आहेत ज्यांचे या समाजावर ऋण आहे.या व्यक्ती मेल्या परंतु यांचे विचार कधीच मरणार नाहीत याची काळजी आपणास घ्यावी लागणार आहे.
          बऱ्याचवेळा ज्या घटना डीजीटल मिडीया आपल्यापर्यंत पोहोचु देत नाही त्या घटनांना प्रकाशात आणन्याच काम सोशल मिडीया करत असते आणि अशाच मुद्द्यावर काही लेखक,विचारवंत,पत्रकार,लोकं निर्भीडपणे लीहुन त्यांना वाचा फोडण्याच काम करत असतात अशा परिस्थितीत आपण त्यांच्या पाठीशी खंबीरपण उभे रहायला हवे कारण त्यांची निर्भीडता सर्वांना पचणी पडेलच असे नाही.एकुणच काय तर सोशल मीडीयाचे पडसाद समाजात, डीजीटल मीडीयात आणि प्रिंट मिडीयात पडत असतात.अशावेळी आपण आपल्या वॉलवर काय पोस्ट करत आहोत.त्याचा काय परिणाम होईल या गोष्टीला देखील आपण प्राधान्या द्यायला हवे.आपण आपल्या विचाराने काय बरे काय वाईट हे समजुन वागायला हवे.नाहीतर उगीचच एखादी अफवा शेअर करून आपण देखील नकळत गुन्हेगारी वृत्तीला अन समाज विघातक प्रवृत्तीला समर्थन देऊन बसायचो.
गणेश एस. इंगोले,(विर भगतसिंह विद्यार्थी परिषद,बीड)
मो.नं. : 9561430671

Comments

Popular posts from this blog

कुरूप बदकाचं पिल्लु?

निसर्ग आपला सखा