सोशल मीडिया

सोशल मीडीया
आज सकाळी सहज वॉट्सअप उघडले अन पाहतो तर काय? अगदी मोबाईल हँग व्हावा एवढे मॅसेज एकानंतर एक येऊन धडकायला सुरूवात झाली.थोडावेळ नुसते बघतच रहावे लागले आणि मग कुठे संदेश ऊघडायला सुरूवात झाली.मी एक-एक संदेश पाहत होतो त्यात शुभ सकाळ,शुभ,दुपार,शुभ रात्री,हा संदेश अकरा जणांना पाठवा........सह अनेक संदेश होते.एका मित्राने पाठवलेला छानसा संदेश वाचला व त्याचे अभिनंदन केले.एवढे चांगले संदेश सुचतात कसे असा प्रश्न मी त्याला करताच त्याचा रिप्लाय आला ‘गुगल प्ले स्टोर’ वर सर्व ॲप्स मिळतात.त्यामध्ये सर्व प्रकारचे संदेश असतात.तोपर्यंत काही मित्रांनी त्या संदेशाला दाद द्यायला सुरूवात केली होती. त्याने मला एका ॲप्लीकेशनची लींक पाठवली मी सहज उघडुन पाहीतली पाहतो तर काय त्यामध्ये सर्व प्रकारचे संदेश अगदी यादी करून तयार होते.केवळ कॉपी करा आणि हवे तेथे पोस्ट करा.सुविचार,वैचारीक,गुड मॉर्निंग,गुड नाईट,हॅपी बर्थ डे,शुभेच्छा संदेश,दुख संदेश इ.अनेक प्रकारचे संदेश त्यात अगदी तयार होते.मग मला प्रश्न पडला या रेडीमेड संदेशाने मानसाच्या भावना माणसापर्यंत पोहोचत असतील का? यामध्ये आजची तरूण पीढी गुरफटत तर चालली नाहीये ना अश्या अनेक प्रश्नांची गर्दी माझ्या डोक्यात झाली असतानाच आजीचा आवाज कानावर पडला.काम धंदे सोडुन त्या मोबाईल मधी डोक खुपसुन बसतेत त्यात हाय तरी काय ? घंटा झाल अंघोळीला तापीलेल पाणि गार झाल पण डोक वर नाही केल.अशीच परिस्थिती आजकाल बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळते. मी लगेचच माझा मोबाईल बंद केला अन सहजच मनात विचार डोकावला कदाचीत या इंटरनेटच्या युगाने आळशी आणि विचार शुन्य पिढी तर निर्माण होत नाहीत ना ? कारण आज जर आपण पाहीतले तर समाज माध्यमावरील ऑनलाईन असणारांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.दिवसभर ऑनलाईन राहुन हे लोक करतात काय तर ह्याचा आलेला संदेश त्याला पाठव त्याचा आलेला संदेश ह्याला पाठव.इकडचे तीकडे करण्यात दिवस कधी संपतो ते कळत देखील नाही.त्यातच चारशे रूपयात तीन महीने दररोज दोन जीबी इंटरनेट मिळत असल्याने या तरूणांना बेरोजगारी तसेच सामाजीक प्रश्नांची जाणीव देखील होताना दिसत नाही.अर्थात इंटरनेट वापरणे जरी चांगले असले तरी त्याचा अतीरेक करणे केव्हाही वाईटच.असे अनेक युवक आहेत ज्यांना सोशल माध्यमांमुळे समाजीक रोशाला व पोलीस कार्यवाहीला सामोरे जाण्याची वेळ येत आहे.या इंटरनेटमुळे आजचा तरूण वर्ग आभासी जगाकडे जास्त आकर्षीत झालेला दिसुन येत असल्याने कामात मन न लागणारे कित्येक तरूण आपण आज पाहत आहोत काहींना तर मोबाईल सोबत नसेल तर अगदी शरीरात प्राण नसल्यासारखे वाटते.तत्रज्ञानाचे व्यसन आजच्या पिढीला लागु पाहतेय.खर तर तरूणांनी याच इंटरनेटच्या माध्यामातुन जगभरातील अनेक भाषा शिकायला हव्यात,अनेक कौशल्य या इंटरनेटच्या माध्यमातुन आत्मसात करायला हवे परंतु दुर्दैव खुप कमी तरूण-तरूणी तसे करताना दिसतात.यु-ट्युब, सारखी वेबसाईट तुम्हाला हवे त्या विषयाचे ज्ञान अगदी एका क्लीक वर उपलब्ध करून देते शिवाय या साईटच्या माध्यमातुन तुम्ही कमाई देखील करू शकता.यु-ट्युब वर How can I earn online? एवढ जरी टाईप केल तरी अनेक व्हिडीओ तुम्हाला ऑनलाईन कमाई बद्दल मार्गदर्शन करतील परंतु आपण फक्त यु-ट्युबचा वापर मालीका,मनोरंजन आणि व्हिडीओ पाहण्यासाठी करत आहोत. काही तरूण मात्र इंटरनेटवर मेहनत करून कमाई करताना देखील दिसत आहेत.मला या लेखनाच्या माध्यामातुन एवढच सांगायचे आहे की इंटरनेटने आपल्या ज्ञानाच्या कक्षा वाढत आहेत मात्र आपण जोपर्यत त्या ज्ञानाचा वापर आपण करनार नाहीत तोपर्यंत आपल्याला त्याची ताकद देखील कळणार नाही. - गणेश इंगोले

Comments

Popular posts from this blog

कुरूप बदकाचं पिल्लु?

निसर्ग आपला सखा