अपयश नव्हे ते यशच

परवा दिवशी वर्तमान पत्र उघडल पाहतो तर काय? अगदी पहील्याच पानावर परिक्षेत मार्क कमी मिळाले म्हणुन विद्यार्थ्याची आत्महत्या अशी ठळक अक्षरातील बातमी दिसली.केवळ परिक्षेत कमी गुण मिळाले म्हणुन निराश होऊन जिवन संपवले वाचुन खुप वाईट वाटले.आणि मनात विचार आला की,आजच्या ह्या एकविसाव्या शतकातील हे मुलं एवढया कमकुवत मानसिकतेचे कसे असतील आणि यांचे 10 वी 12 वी मार्क यांचे आयुष्य ठरवणार आहेत का? या मुलांवर विनाकारण दबाव आणनारे कोण तर त्यांचेच पालक आणि नातेवाईक कारण तेच फोन करून सांगतात ना आमच्या भैय्याला 98 टक्के पडले तुमच्या भैय्याला किती पडले? आपण देखील आपल्या मुलाला टोमने मारायला सुरू करतो त्याला 98 पडले तुच कसा असा मुर्ख निघाला.बर मला हे सांगा तो 98 वाला जिवनाच्या परिक्षेत पास होईल का? मी कित्येक मुलांना पालकांच्या अपेक्षांच्या ओझ्याखाली दबलेल पाहील आहे.अशी मुल जगण विसरत चालली आहेत.ती एकलकोंडी होत आहेत.जगण्यातला निखळ आनंद त्यांच्या वाट्याला येत नाहीये.अगोदर त्यांना मोकळा श्वास घेऊ द्या.त्यांना भरपुर जगु द्या, त्यांच्याशी गप्पा मारा, त्यांना काय आवडत काय नाही ते बघा.अन्यथा अशी मुल केवळ पालकांच्या अपेक्षेचे ओझे वाहणारी गाढव होतील.त्यांना उद्याच्या समाजातील जबाबदार नागरीक बनवायचे असेल तर त्यांची रेस लाऊन चालणार नाही.त्यांच्यात अपयश पचवण्याची क्षमता देखील निर्माण करावी लागेल.अपयश ही यशाची पहीली पायरी आहे हे त्यांना पालकांनी निक्षुन सांगायला हवे.कुठलेही अपयश हे शेवटचे नसते हे त्यांना ठासुन सांगावे लागेल.आज आपण हारलो असलो तरी उद्या आपण जिंकणार आहोत हा आत्मविश्वास पालकांना आपल्या पाल्यात निर्माण करता आला पाहीजे. 
     थॉमस अल्वा एडीसन : आज जो आपण विजेचा झगमगाट पाहतो त्याचा जनक असलेला हा अवलीया याची कहाणी आपणास माहीत आहे का ? या एडीसनला विजेच्या बल्बचा शोध लावत असताना तब्बल 300 वेळा अपयश आल तरी त्याने प्रयत्न सोडले नाहीत,त्यांने 301 व्या वेळेस प्रयत्न केला आणि आश्मयुगातील शेकोटीच्या उजेडानंतर प्रथमच मानव जातीला विजेचा उपभोग घ्यायला मिळाला.कोणीतरी त्याला एका मुलाखतीत विचारल तुम्ही 300 वेळा अपयशी झालात आणि 301 व्या वेळेस दिवा पेटवण्यात यशस्वी झालात मग तुम्ही 301 वी पध्दत जर पहील्यांदाच वापरली असती तर खुप अगोदर शोध लागला असता त्यावर एडीसन उत्तरला तुमचा कदाचित काही गैरसमज झाला असावा कारण मी 300 वेळा अपयशी नाही झालो तर प्रत्येक वेळी मला दिवा न पेटणारी नवीन पध्दतीचा शोध लागत गेला मी 300 पध्दतीने दिवा लागु शकत नाही हे सिध्द करून मग दिवा पेटवला.एवढी कमालीची सकारात्मकता या अवलीयामध्ये कुठुन आली असावी ? नाहीतर आपला भारतीय एडीसन असता तर आत्तापर्यंत चार-दोन वेळा आत्महत्या करून रिकामा झाला असता.या गोष्टी केवळ मनोरंजनासाठीच आहेत का ? ही सकारात्मकता आम्ही आमच्या पाल्यात कधी रूजवणार.त्यांना अपयशातुन यशस्वी होण्याचा कानमंत्र देणार.एडीसन हे एक उदाहरण झाले असे कित्येक उदाहरण आपल्याला माहीत आहेत.आपले अपयश हे त्यांच्या अपयशापुढे काहीच नाही . 
     आपण ज्या महाराष्ट्राच्या मातीत राहतो त्या मातीत शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य उभ केल ते काही केवळ एका प्रयत्नाचे फलीत नाही.शिवाजी महाराजांच्याही अगोदर शहाजी राजेंनी हा प्रयत्न केला होता त्यांना अपयश आल परंतु शिवबा राजेंच्या रूपाने ते स्वप्न साकारलच.त्यासाठी त्यांनी महाराजांना अवश्यक ती सर्व कौशल्य शिकवली तावुन-सुलाखुन काढल महाराजांना.आपण मात्र कधी लेकरांचा धड दोन तास अभ्यास घेत नाही अन् मार्क कमी पडले की बस येता-जाता टोमणे सुरू करतो.10 वीत कमी पाडलेत पडु दे 12 वीत जास्त घेईल,बारावीत नाही तर सी.इ.टी.त जास्त घेईल बर जरी तो मुलगा डॉक्टर किंवा इंजिनीयर झाला नाही तर काही फरक पडणार आहे का? डॉक्टर-इंजिनीयर होण हेच त्यांच्या जिवनाच अंतीम ध्येय आहे का? या समाजाला चांगल्या लोकांची देखील गरज आहेच ना.त्यांच्यातील एखादा शिक्षणाची गंगा सर्वसामान्यापर्यंत पोहोचवणारे महात्मा फुले होऊ द्या.अनाथ अपंगांची सेवा करणारा एखादा अवलीया यांच्यातुनही घडु द्या एखादी मदर तेरेसा एखाद्या सिंधुताई सपकाळ यांच्यातुन घडल्यातर हा समाज सुधारेल अन्यथा सामाजीक जाणीवेचे भान नसलेली उच्चशिक्षीत,पांढरपेशी पीढी जन्माला येऊन समाजाचे वाटोळे होईल.म्हणुन अगोदर आपल्या मुलाला एक जबाबदार नागरीक कस घडवता येईल याचा देखील विचार पालकांनी करण्याची गरज आहे. 
      जर एवढ करूनही एखाद्याला आत्महत्या करण्याचा विचार येत असेल तर त्याने फक्त एकदा स्वातंत्र संग्रामातील त्या शहीदांची आठवण करून पहा तो तुमच्या वयातील शिरीष कुमारला आठवा त्या भगतसिंह,राजगुरू,सुखदेव या मित्रांना आठवा.तुम्ही मेलात तर फक्त तुमच कुटुंब नाही तर अवघा देश रडला पाहीजे.पांढऱ्या कापडात नाही तर तिरंग्यात लपेटल पाहीजे एवढ कर्तुत्व करा तर मरण्यात अर्थ आहे.

 गणेश इंगोले,9561430671
( विर भगतसिह विद्यर्थी परिषद तालुका अध्यक्ष,बीड )

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

कुरूप बदकाचं पिल्लु?

निसर्ग आपला सखा