"ये सूरत बदलनी चाहिए"



आपण भारतीय म्हणजे शांत,संयमी आणि मायाळु लोकं.आपला भावनांक नेहमी बुध्यांकावर मात करत असल्यामुळे अपण बऱ्याचवेळा लोकांच्या खोट्या बोलण्याला देखील बळी पडतो.म्हणुनच आपण नेहमी आपल्या देशातील नेत्यांच्या आश्वासनांवर विश्वास ठेऊन प्रत्येक वेळा त्यांना निवडुन देत असतो आणि नेहमी फसत असतो पण पुन्हा आपल्याला कोणीतरी भावनीक साथ घालत येत आपल्याला पुन्हा फसवत. आपण समजतो आज नाहीतर उद्या तरी हा आपले काम करेल या वेड्या आशेपोटी आपण या भामट्या मंडळींच्या आहारी जाऊन नकळत त्यांच्या सारखे निर्दयी होऊन जातो हे आपले आपल्याला कळत नाही.त्यातली त्यात आज तर निर्दयीपणाची स्पर्धाच लागली की काय असे वाटायला लागले आहे; कारण आपल्या देशात आणि शहरात अशा काही घटना घडत आहेत ज्यांच्यामुळे आपल्यात माणुसकी आणि प्रेम नावाचे काही गुण शिल्ल्क आहेत की नाही यावर प्रश्न उपस्थित करावासा वाटतो.
          खुप दिवसांपुर्वीच्या नाही अगदी या आठवडयातील काही घटना पाहल्या तर आपणास देखील या गोष्टीचा प्रत्यय येईल.काल परवा सोशल मिडीयावर एक पोस्ट फिरत होती,युपी मधल्या एका अल्पवयीन मुलीस जिवंत जाळले.तोसीफ शेख नामक एका मुस्लीम व्यक्तीने अनाधीकृत बांधकाम हटवण्यासाठी स्वत:ला जिवंत जाळुन घेतले.बीड शहरात भर रस्त्यावर एकाने आपल्याच बहीनीच्या नवऱ्याला तीच्या डोळ्या देखत धारदार शस्त्राने भोसकुन मारले.तीन आणि पाच वर्षाच्या भावंडासोबत 19 वर्षाच्या युवकाने ब्ल्यु फिल्म पाहुन अनैसर्गीक कृत्य केले.या तर फक्त तुम्हाला आम्हाला माहीत असलेल्या पण अशा कित्येक घटना या देशात आणि आपल्या शहरात घडत आहेत. वरील सर्व घटना अत्यंत वाईट अहेत. यापैकी बऱ्याच घटनांचे  व्हिडीयो आपणास मोबाईल मध्ये पहायला मिळत आहेत.याचा अर्थ असा होतो की,त्या घटना घडत असताना माणसं त्या ठिकाणी उपस्थित होती पण त्यांनी त्या पीडीतांना वाचवण्या ऐवजी आपल्या मोबाईलवर शुटींग करणे पसंत केले इतपर्यंत आपल्यातील माणुसकी संपत असताना बातमी आली की एका डीलीव्हरी बॉय ने महानगरातील इमारतीला लागलेल्या आगीतुन दहा जणाचे प्राण वाचवले कुठे तो दहा जणाचे प्राण वाचवणारा आणि कुठे हे व्हीडीयो बनवुन एकमेकांना पाठवत तळतळ-हळहळ व्यक्त करणारे मुर्दाड आणि भावनाशुन्य लोकं.माणसातली माणुसकी संपत असताना या एकट्याने दहांना वाचवल आपण मात्र नुसता तमाशा बघत राहीलो.जर त्या व्हीडीयो काढणाऱ्यांनी त्या युपीतल्या मुलीला वाचवल असत तर? त्या तोसीफ शेखला वाचवण्यासाठी प्रयत्न केले असते तर? त्या गर्दीतुन एकाने जरी त्या भावाला रोखण्याचा प्रयत्न केला असता तर? आज ती मुलगी आपल्या माय बापांना,तो तोसीफ आपल्या घर-परिवाराला अन् ती बीडची युवती आपल्या पतीच्या प्राणाला मुकली नसती.पण आपण निर्दयी झालो नुसत बघत राहीलो ते थोडेच आपले कोणी सगे-सोयरे होते.हे विश्वची माझे घर हे फक्त बोलण्यासाठी असत ना? ती शाळेत शिकवलेली नितीमुल्य फक्त मिरवण्यासाठीच असतात? ती प्रतिज्ञा, भारत माझा देश आहे.सारे भारतीय माझे बांधव आहेत....ती सुध्दा फक्त शाळेपुरतीच मर्यादित असते? यालाच शिक्षण अन् संस्कार म्हणायच? एखाद्याचा प्राण जात असताना मुर्दाडासारख बघत बसन्यात कसली आलीय माणुसकी अन मर्दुमकी.
          एखादा मारधाड असलेला चित्रपट पाहीतला की आपलं रक्त सळसळत,हाताच्या मुठी वळतात,दात दातावर जोरदार दाबुन आपण म्हणतो, अरे मी असतो ना त्या जागेवर तर.....मोठ-मोठ्या गप्पा मारणे खुप सोपे आहे.पण प्रत्यक्ष मात्र ते शक्य होत नाही.प्रत्यक्षात आपण विचारच करत नाहीत कारण ती घटना आपल्या सोबत  घडत घडत नसते ना. एखादी घटना घडली तरी आपण काय करणार मेनबत्या घेऊन रस्त्यावर मोर्चा काढणार.चार-आठ दिवसात सर्व विसरून जाणार पुन्हा आपले मुर्दाडासारखे जगायला रिकामे.या सर्व घटना आपण रोखु शकतो हे आपल्याला माहीत आहे पण आपण त्या रामायणातल्या हनुमानासारख उडण विसरलो आहोत.त्याला जाबुवंतानी लक्षात आणुन दिलं आपल्याला कोण देणार? आपल्या राज्यात घडलेली घटना आपल्या गावात घडायला फारसा वेळ लागनार नाही.ती घटना आपल्या घरापर्यंत येण्या अगोदर जागे व्हा.जसे कँडल मार्चसाठी एकत्र येता तसे अन्याय घडताना एकत्र व्हा अन्याय करणाराला फोडुन काढा. तुम्ही प्रथम भारतीय आहात हे तुमच्या मनाला ठासुन सांगा. पहील्यांदा शाळेत घेतलेली ती प्रतिज्ञा आठवा आणि  मग बघा सारे भारतीय तुम्हाला तुमचे बांधव वाटतात की नाही.देश तुम्हाला तुमचे घर वाटतो की नाही.जसे ओ.बी.सी.,जनरल,एस.सी.,एस.टी.,एस.इ.बी.सी. म्हणुन एकत्र येता तसे फक्त एकदा भारतीय म्हणुन एकत्र येऊन बघा. मग बघा या देशाला लुटणारे नेते,गुन्हेगार,ठगं,व्यापारी कसे सुतासारखे सरळ होतील. तुम्ही-आम्ही भारतीय म्हणुन एकत्र येणार नाहीत तोपर्यंत हा देश मुर्दाडासारख निसत बघतच राहील.अशा कित्येक घटना घडत राहतील लोकं मरत राहतील आणि त्यांच्यासोबत आपल्यातली माणुसकी देखील मरत जाईल हि माणुसकी जिवंत ठेवायची असेल तर हिंदीतील एक कवी म्हणतो,
हो गई है पीर पर्वत-सी पिघलनी चाहिए, इस हिमालय से कोई गंगा निकलनी चाहिए।
आज यह दीवार, परदों की तरह हिलने लगी, शर्त लेकिन थी कि ये बुनियाद हिलनी चाहिए।
हर सड़क पर, हर गली में, हर नगर, हर गाँव में, हाथ लहराते हुए हर लाश चलनी चाहिए।
सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं, सारी कोशिश है कि ये सूरत बदलनी चाहिए।
मेरे सीने में नहीं तो तेरे सीने में सही,हो  कहीं भी आग, लेकिन आग जलनी चाहिए।
म्हणुन अन्याय अत्याचारा विरोधात हि आग तुमच्या काळजात लागो आणि इश्वर तुम्हाला लढण्यास शक्त प्रदान करो ही प्रार्थना करतो.

डी.एस.इंगोले,पिंपळनेर (ग.)
मो.नं. 9561430671

Comments

Popular posts from this blog

कुरूप बदकाचं पिल्लु?

निसर्ग आपला सखा