पिंपळनेर तालुका निर्मीती बद्दल माझे मत

पिंपळनेर तालुकानिर्मीतीबद्दल माझे मत...
गणेश इंगोले पिंपळनेर
मो. ९५६१४३०६७१
पिंपळनेर सर्कल म्हटल की मला आठवतं ते इथल्या जेष्ठ नागरीकांनी सांगीतलेल व वर्तमान पत्रातुन वाचलेल कधी काळी गल्ली ते दिल्ली सत्तेची फळे चाखणार पिंपळनेर,पण आज जर या गावाकडे पाहीतल तर गावाचा जो विकास व्हायला पाहीजे होता तेवढ्या प्रमाणात झाला नाही.आज या गावाची अवस्था त्या बैलासारखी झाली आहे जो आयुष्यभर मालकाच्या शेतात राब-राब राबतो अन मालक त्याला त्याच्या म्हातारपणी खाटकाला विकतो.कारण जर निरीक्षण केल तर अस लक्षात येईल की या गावातील बहुतांश लोक हे बाहेरून आलेले आहेत.बाहेरून येऊन इथे व्यवसाय,शेती करणारे या लोकांना देखील या गावाने भरभरून दिले आहे.मात्र आता वेळ आली आहे आपण या गावाला काही देण्याची या गावाचा विकासाचा अनुशेष भरून काढण्याची विकासाचा अनुशेष जर कशाने भरुन निघणार असेल तर याच उत्तर कदाचीत तालुका निर्मीतीच्या प्रश्नात दडलेल असाव.म्हणुन या गावातुन व सर्कल मधुन मोठ्या प्रमाणत या प्रश्नावर सक्रीय होण्यची आणि लोकअंदोलन उभारण्याची गरज आज भासताना दिसुन येत आहे.
 काल परवा वर्तमान पत्रात वाचल अंबेजोगाई जिल्हा निर्मीतीच्या हालचाली गतीमान झाल्या आहेत.जर अंबेजोगाई जिल्हा निर्मीती झाली तर तालुका  निर्मीती ही अटळ आहे आणि पिंपळनेर तालुका निर्मीतीचा प्रश्न गेली कित्येक वर्षापासुन चर्चीला जात आहे.मात्र आता गरज आहे ती उपोषन,मोर्चे,बंद पाळणे व लोकअंदोलन उभारण्याची जर पिंपळनेर करांनी अंदोलन उभारल नाही तर प्रशासकीय पातळीवर पिंपळनेरची दखल कोणी घेणार नाही.म्हणुन येथील राजकीय पुढाऱ्यांनी,सामाजीक कार्यकर्त्यांनी,पत्रकार बांधवानी,युवकांनी पुढे येउन एक अराजकीय लढा उभारण्याची गरज आहे.आज जर पिंपळनेरकरांनी थोडे प्रयत्न केले तर कदाचित हा प्रश्न कायम मार्गी लागु शकतो.काही वर्षापुर्वी ही चळवळ उभी राहीली होती मात्र जिल्हा निर्मीतीचा प्रश्न पुढे ढकलल्यामुळे या चळवळीला मरगळ आल्यासारखी झाली आहे पण आता नव्या दमाच्या युवकांनी अन सामाजीक व राजकीय लोकांनी पुढे यावे असे मत सर्वत्र व्यक्त होताना दिसत आहे.
                पिंपळनेर गावची लोकसंख्या पाहीतली तर दहा ते बारा हजार लोकसंख्या असलेल हे गाव लोकसंख्येच्या दृष्टीने देखील सक्षम आहे.येथील बाजारपेठेची उलाढाल देखील समाधानकारक असुन दळण-वळणाच्या सोई-सुविधांचा विचार केला असता नव्याने मंजुर झालेले तीन राष्ट्रीय महामार्ग या गावातुन जात आहेत तसेच बीड शहराच्या पुर्वेस 25 कि.मी अंतरावर असलेले हे गाव निजामकालीन केंद्र होते तसेच सरकारी कार्यालये,शाळा,महाविद्यालये,पोस्ट ऑफीस,पोलीस स्टेशन,सॉ मील,टेलीफोन कार्यालय,सहकारी बॅका,ग्रामपंचायतची भव्य इमारत,पशु वैद्यकीय दवाखाना,खाजगी दवाखान्यांसह प्राथमीक आरोग्य केंद्राची भव्य इमारत तसेच जिल्हा परिषद,पंचायत समीती सर्कल असणारे हे गाव गेवराई,बीड,वडवणी,माजलगाव या तालुक्यांच्या मध्यवर्ती आहे.या ‍ ठिकाणी मोठा अठवडी बाजार आहे गावाची रचना देखील अप्रतीम असुन अनेक खेडे,वाड्या,वस्त्या,तंड्यांचे या गावला रोजचे दळण-वळण आहे.
                या गावात दोन गणपतीची मंदिर आहेत मुस्लीम बांधवांच्या मस्जीदी देखील आहेत. हिंदु-मुस्लीमांसह सर्व अठरापगड जाती येथे गुन्या गोविंदाने नांदत आहेत.दर चतुर्थीला येथे यात्रा भरते हजारो भावीक दर्शनाला येतात.येथील आशापुरक गणेश मंदिराचे बांधकाम जवळपास पुर्ण होत आले असुन तीर्थ क्षेत्राच्या दृष्टीने मंदिराचा विकास केला जात आहे.त्याचबरोबर गावाच्या दोन्ही बाजुने दोन नद्या वाहतात अलीकडील काळात त्या नद्यावर सेवाभावी संस्थेसह प्रशासनाने अनेक बंधारे देखील बांधले आहेत तसेच पिण्याच्या पाण्यासाठी जवळच लींबारूई (देवी) व अंबेसावळी  येथील दोन्ही तलावावरून पाईपलाईन केलेली आहे.सामाजीक,धार्मीक व अर्थीक दृष्टीने सक्षम असणाऱ्या या गावाला स्वातंत्र्य सैनिकांची परंपरा देखील आहे.हैद्राबाद मुक्ती संग्राम लढ्यात येथील स्वातंत्र्य सैनिकांनी सहभाग नोंदवुन प्राणाचे बलीदान केले आहे.आता मात्र याच स्वातंत्र्य सैनिकांकडुन प्रेरणा घेऊन तालुका निर्मीतीचा लढा उभारण्याची अवश्यक्ता आहे.
अशा या सर्व सोई-सुविधांनी सक्षम असणाऱ्या पिंपळनेर या गावाचे तालुक्याचे स्वप्न पुर्ण व्हावे हीच अपेक्षा येथील सामान्य जनता व्यक्त करत आहे.

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

कुरूप बदकाचं पिल्लु?

निसर्ग आपला सखा