काम की बात

साधारण एक अठवड्या पुर्वीची गोष्ट आहे. राम मंदिराचे भूमिपूजन होणार म्हणुन सर्वजण उत्साहात होते. ( त्या सर्वात मी पण येतो हे वेगळे सांगायला नको) पण देशातील अनेक रूग्ण कोरोना सारख्या वैश्विक महामारीमुळे व अपुऱ्या वैद्यकीय सेवा- साधनांमुळे  उपचाराअभावी मरण पावत असताना मंदिराचे उद्घाटन करण्यापेक्षा एखाद्या मोठ्या सर्व सोयीयुक्त हॉस्पिटलचे उद्घाटन करणे अपेक्षित होते. (फक्त अपेक्षित होते म्हणतोय मी) असे मी सहजच माझ्या मित्राशी बोलताना म्हणालो. 

मित्र तसा थोडा शिक्षीत (थोडाच हा, जास्त नाही) आणि व्यवहारीक दृष्टीने देखील हुशार होता (हा माझा गैरसमज होता) पण त्याने बोलताना सांगायला सुरुवात केली की, बरं झालं राम मंदिराचे भूमिपूजन झाले. कित्येक वर्षांपासून प्रलंबित मुद्दा निकाली लागत आहे (खरंतर आणखी खुप वेळ आहे, दोन टर्मच्या निवडणुका त्यावर पार पडतील) आणि तसेही देशात दवाखान्यांची काही कमी नाही, याचे उदाहरण देताना त्याने गावातील क्लिनीक व शहरातील खाजगी दवाखान्याचे उदाहरण दिले. अर्थात त्याचे म्हणनेही बरोबर होते त्याच्या दृष्टीने. (पण मी मल्टी स्पेशालिटी सरकारी रुग्णालया बाबत बोलत होता हे त्याच्या लक्षात आले नसावे बहुदा.) 

खाजगीकरणाचे सर्वसामान्य जनतेवर होणारे परिणाम त्याला माहीत नसावे अथवा त्याने त्याबाबत अभ्यास केला नसावा. तो भावनिक विचार करत होता आणि मी प्रॅक्टिकली. मी विस्तृतपणे बोललो असतो तर त्याला लक्षात आले नसते हे मी त्याच्या वरील बोलन्यातुन ओळखले होते म्हणुन मी त्याचे म्हणने मान्य करुन विषय संपवला कारण तो माझा मित्र होता आणि त्याचबरोबर मला वादात पडायचे नव्हते. (नाहीतर मी राममंदिर विरोधात आहे असा डांगोरा पिटायला तो मोकळा झाला असता.)

यातुन एक गोष्ट मात्र माझ्या लक्षात आली की, आपले राजकीय नेते जनतेला भावनिक मुद्यात अडकवून आपला हेतू साध्य करुन घेतात आणि त्याच सोबत त्यांना वैचारिक गुलाम देखील बनवतात. तर आपल्या जनतेला देखील या गुलामीत आनंद वाटतो कारण गुलामीत स्वत:च्या डोक्यातील मेंदुचा वापर करायचा नसतो आणि दुसऱ्याच्या डोक्याने चालायला बुध्दीची गरज नसते. कदाचित याच गोष्टीमुळे भारत देश लोकशाही राष्ट्र असुन देखील विकासात्मक बाबतीत मागे व भ्रष्टाचारात पुढे असावा. म्हणुन देशात स्वातंत्र्यानंतर आजही मुलभुत प्रश्न जशास तसे आहेत. 

आजही येथील निवडणुकीत धार्मिक मुद्दे, रस्ता, विज, पाणि हेच मुद्दे प्रामुख्याने पुढे केले जातात आणि शिक्षण, आरोग्य, रोजगार या मुळ मुद्द्यांना पध्दतशीरपणे बगल दिली जाते. कारण येथील जनता नोकरदारांना व नेत्यांना आपला मालक मानते व ते सांगतील ते गुमान ऐकते. पण प्रत्यक्षात मात्र लोकशाहीत जनताच देशाची मालक असते मात्र हे लोकांना समजेपर्यंत लोकं बुध्दीने अपंग झालेले असतील आणि कदाचीत तेव्हा देशातील लोकशाही शेवटची घटका मोजत असेल आणि तेव्हा त्यांना गुलामी शिवाय पर्याय उरलेला नसेल. मग पुन्हा क्रांतीकारी विचारांच्या तरूणांना दुसऱ्या स्वातंत्र्य संग्रामाचे रणशिंग फुंकावे लागेल. पुन्हा तेच 

लेखन आणि शब्दांकन : Ganesh Ingole (M.A. MCJ)

#राम_मंदिर #कोरोना #हॉस्पिटल #गुलामी #राजकारण #Corona #Politics #गणुची_गोष्ट

Comments

Popular posts from this blog

कुरूप बदकाचं पिल्लु?

निसर्ग आपला सखा