Posts

निसर्ग आपला सखा

Image
निसर्गासारखा मित्र शोधुन सापडणार नाही. जसं मित्र सोबतीला असतील तर माणूस अगदी बिंदास असतो, आनंदी असतो कसली चिंता नसते ना कशाची फिकीर असते. जगातील सर्वात सुरक्षित जागा म्हणजे मित्रांचा सहवास असतो. त्यातल्या त्यात मित्रांसमवेत निसर्गाचे सान्निध्य लाभणे म्हणजे स्वर्गीय अनुभूती घेण्यासारखे आहे. तो स्वर्गिय अनुभव आज आम्ही मित्रांनी घेतला. जागतिक महामारी कोरोनामुळे बहुतेक अॉफिसनी वर्क फ्रॉम होम सुरू केले आणि बऱ्याच दिवसानंतर विविध शहरांत कामानिमित्त विखुरलेले मित्र गावातील कट्ट्यावर जमले. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या आणि मग कुठेतरी बाहेर जाऊया असा प्लॅन ठरला. पण तो प्रत्यक्षात आणायला अनेक अठवडे खर्ची पडले. शेवटी काल ठरले की उद्या सकाळी जायचेच. मग ठरल्या प्रमाणे सकाळी लवकर उठून फोन करायला सुरुवात झाली. त्यात दोन-तीन जणांनी टांग दिली आणि परत एकदा प्लॅन कॅन्सल होतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. पण इरादा पक्का होता म्हणुन "दो से भले चार" म्हणत अविनाश,मी आणि अलीम आम्ही तिघांनी गाड्या रस्त्यावर काढल्या पुढे जवळ्यात हरी केव्हाच आमची वाट बघत बसला होता. त्याला घेऊन  अखेर मा...

बीडचा गर्दीतला कोरोना प्रवास

बीड शहर दहा दिवस बंद राहणार असल्याने मित्र योगेश नरवडे यांच्यासोबत मी आज कृषी दुकानाचा माल खरेदी करण्यासाठी शहराकडे निघालो होतो. शहराच्या जवळ आलोच ह़ोतो की पावसाने चाल केली. तांड्यावर चिलट्या (भुरभुर) पाऊस सुरू झाल्याने गाडी मागे वळुन निवारा शोधण्याचा अंदाज लागताच मी पुढे उड्डाण पुलाखाली थांबता येईल म्हणुन गाडी तशीच दामटायला लावली. शे-दोनशे मिटर पुढे आलो की लगेच पाऊस बंद झाला. कदाचित त्याला शहरात जाणाऱ्या माणसांना भीजवण्यात आनंद वाटत असावा. तसेही आजकाल मुद्दामहून कोणी पावसात मनसोक्त भिजताना दिसत नाही. म्हणुन हा निसर्गाचा प्रयत्न असावा. असो. शहरात प्रवेश करताच मोंढ्याकडे जाणाऱ्या खोदुन ठेवलेल्या रस्त्यातील छोट्या-छोट्या स्विमींग पुलातून रस्ता शोधत आणि आपल्याच देशातील मातीचा सुगंधित चिखल श्री कृष्ण जन्माष्टमीच्या मुहुर्तावर राधा-कृष्णाने रंगपंचमी खेळावी तशी पण एकमेकांच्या अंगावर जाऊन नस्ती भांडणं होणार नाही अशा रीतीने उडवत निघालो होतो. पुढे वाहनं ऊभी दिसताच शहर बंद राहणार म्हणुन आज गर्दी थोडी जास्तच असावी असे मनातल्या मनात ठरवत मुंगीच्या पावलांनी पुढे सरकलो तर एक महापुरुष भर रस्त्यावर बं...

काम की बात

साधारण एक अठवड्या पुर्वीची गोष्ट आहे. राम मंदिराचे भूमिपूजन होणार म्हणुन सर्वजण उत्साहात होते. ( त्या सर्वात मी पण येतो हे वेगळे सांगायला नको) पण देशातील अनेक रूग्ण कोरोना सारख्या वैश्विक महामारीमुळे व अपुऱ्या वैद्यकीय सेवा- साधनांमुळे  उपचाराअभावी मरण पावत असताना मंदिराचे उद्घाटन करण्यापेक्षा एखाद्या मोठ्या सर्व सोयीयुक्त हॉस्पिटलचे उद्घाटन करणे अपेक्षित होते. (फक्त अपेक्षित होते म्हणतोय मी) असे मी सहजच माझ्या मित्राशी बोलताना म्हणालो.  मित्र तसा थोडा शिक्षीत (थोडाच हा, जास्त नाही) आणि व्यवहारीक दृष्टीने देखील हुशार होता (हा माझा गैरसमज होता) पण त्याने बोलताना सांगायला सुरुवात केली की, बरं झालं राम मंदिराचे भूमिपूजन झाले. कित्येक वर्षांपासून प्रलंबित मुद्दा निकाली लागत आहे (खरंतर आणखी खुप वेळ आहे, दोन टर्मच्या निवडणुका त्यावर पार पडतील) आणि तसेही देशात दवाखान्यांची काही कमी नाही, याचे उदाहरण देताना त्याने गावातील क्लिनीक व शहरातील खाजगी दवाखान्याचे उदाहरण दिले. अर्थात त्याचे म्हणनेही बरोबर होते त्याच्या दृष्टीने. (पण मी मल्टी स्पेशालिटी सरकारी रुग्णालया बाबत बोलत होता हे त्या...

सेक्स एज्युकेशन अर्थात लैंगिक शिक्षण

आपल्या भारत देशात अनेक लैंगिक अपराध घडतात. काही उघडकीस येतात तर काहीजण बेआब्रु होईल म्हणुन प्रकरणं दाबले जातात. यांचं कारण शोधायला लागलो तर लैंगिक शिक्षणाचा अभाव आणि त्याबाबतची उदासीनता या गोष्टींमुळे काही प्रमाणात आपण या गुन्ह्याना थांबवन्यात कमी पडत आहेत असे लक्षात येते. मध्यंतरीच्या काळात आपल्या शिक्षण विभागाने लैंगिक शिक्षण हा विषय अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु काही मंडळींना असले शिक्षण आपल्या पाल्यांना दिले तर त्याचा त्यांच्या मनावर वाईट परिणाम होईल, म्हणुन यावर नाराजी व्यक्त केली आणि लैंगिक शिक्षण अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याचा प्रयत्न विफल ठरला. आपली भारतीय संस्कृती महान असुन कित्येक वर्षांपासूनची परंपरा आपल्याला लाभली आहे. आपल्या भारतीय संस्कृतीवर पाश्र्चात्य देशांनी संशोधन करून त्यातील अनेक गोष्टी अंगीकारल्या आहेत मात्र आपण त्यांना आजही स्विकारत नाहीत त्यातीलच एक म्हणजे लैंगिकता. आपल्याकडे ३३ कोटी (प्रकारचे) देव आहेत. त्यात कामदेव आणि रती देवी हे लैंगिकतेचे देव आपल्याच पुराणातील आहेत तर कामसुत्र हा जगप्रसिद्ध ग्रंथ आपल्याच वात्सायन ऋषींनी लिहीलेला आहे...

मावळे फसले गणीमी काव्यात

Image

स्वराज्याचे खरे शत्रु कोण?

Image

कुरूप बदकाचं पिल्लु?

Image
परवाच दहावीचा निकाल जाहीर झाला.अनेकजण भरघोस टक्के मार्क घेऊन पास झाले. त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. त्यांनी मिळविलेल्या यशा बद्दल त्यांचे कौतुक व्हायलाच हवे ! यात दुमत नाही मात्र याचवेळी कमी मार्क घेणारांना घरच्यांसह शेजाऱ्यांचे व पाहुण्यांचे टोमणे सहन करावे लागत आहेत. या टोमण्यांमुळे मात्र या विद्यार्थ्यांची पुरती पंचायत होत आहे.टक्केवारी चांगली आहे पण त्याच्या किंवा तिच्या एवढी का नाही म्हणुन पालक मुला-मुलींना दुखावत असल्याने कित्येक विद्यार्थी स्वत : ला कोसताना पहावयास मिळत आहेत.मला या सर्व विद्यार्थ्यांना एक गोष्ट सांगायची आहे.ती गोष्ट आहे एका कुरूप बदकाच्या पिलाची.             एका बदकाला चार पिल्लं होतात त्यातील तीन पिलं अगदी छान दिसत असतात, मात्र चौथे पिल्लु जरा कुरूप दिसत असते.ते कुरूप दिसत असल्यामुळे त्याची तीन्ही भावंड त्याला कुरूप म्हणुन चिडवत असतात. खेळायला जायचे असल्यास ते भावंड त्याला सोबत घेत नसत व त्याला दिसण्यावरून त्याला सतत चिडवत असत. त्यांचे पाहुन इतर प्राणी देखील त्या पिलाला चिडवायला लागतात. त्...

माणसं असे का वागत असतील?

या पृथ्वीवर अनेक जीव आहेत त्यापैकी मानव हा सर्वात प्रगत आणि हुशार असा जीव आहे. माणुस हा खुप विचीत्र प्राणी आहे. माणसांचे त्यांच्या वागण्यावरून अनेक प्रकार पडतात काही माणसे खुप कडक शिस्तीचे असतात, काही बिन्‍दास असतात तर काही खुप खडुस असतात, काही अगदी मायाळु स्वभावाची तर काही कपटी आणि कारस्थानी स्वभावाचे असतात. मला यातील जवळपास सर्व प्रकारची मानसे भेटली.खुप वेळा माझे त्यांच्याशी जमले नाही,कधी त्यांचे वागणे मला तर कधी माझे वागणे त्यांना खटकत असे परंतु जेव्हा-जेव्हा समोरा समोर येऊन बोलत असु तेव्हा मात्र मणात कसलाही मळ न राखता अगदी झाल गेलं विसरून कुठलाही आकस न ठेवता आम्ही पुन्हा कामाला लागलो.   मात्र वरील प्रकारातील कपटी आणि कारस्थानी लोक हे कायम असमाधानीच राहीलेली मी पाहीतले आहेत. खर तर या लोकांना इतरांचे चांगले झालेले खपत नाही. यांना इतरांची प्रगती देखवत नाही यांच्या कायम पोटात दुखत असते. यांच्या इच्छा कधीही पुर्ण होत नाहीत. या प्रकारातील माणसे सतत इतरांना त्रास देण्याच्या नव-नवीन युक्त्या शोधत असतात. या प्राकारातील माणसं म्हणजे निचपणाचा कळस असतात. हे कधी कुठल्या थराला जातील याच...

“पाणी आलं रे गणु”

आज पुन्हा एकदा एक निरीक्षण घेऊन आलो आहे, प्रसंग तसा नवीन किंवा अनोळखी नाही. साधारण सायंकाळचे पाच वाजले असतील माझा फोन खणाणला पलीकडुन आवाज आला, “ पाणी येणार आहे लवकर घरी ये .” फोनवर माझे वडील होते.गेली पंधरा ते विस दिवस झालं डोळयात पाणी आणुन आम्ही पाण्याची वाट पाहत होतो.आज पाणी येणार म्हणुन मी ऑफीसातली सर्व कामे टाकुण पटकन धावत घराच्या दिशेने निघालो.घाई गडबडीत घराकडे निघालो असल्याने रस्त्याने होत असलेल्या गोंगाट आणि गोंधळाकडे माझं फारसं लक्ष नव्हत घरापर्यंत पोहोचलोच होतो तेवढ्यात आमच्या शेजारी राहणाऱ्या राधा मावशीच्या घरासमोर थोडीशी गर्दी दिसली तसे पाणी आल्यानंतर घरासमोर गर्दी म्हणजे पाणी पाहीजे असेल म्हणुन आले असतील असं मला वाटलं, पण जवळ जाताच गर्दीतुन आवाज आला “ मोटर बंद करा आगोदर ” हो सद्या आमच्या गावात पाण्याचा प्रश्न अगदीच गंभीर झाला आहे.काल पाणी आले पिण्याचा माठ भरतो न भरतो तोच नळाने नटखटपणे गुळण्या मारायला सुरू केले, ते पाहुण रांजणी तर लगेचच रूसुबाइर रूसु म्हणत कोपऱ्यात जाऊन बसली ते थेट आजच तीचा रूसवा काढण्याचा योग आला होता.त्यात राधा मावशीच्या घरी उद्या कार्यक्रम म्हणुन जास्त...

गणु, तुझा सरकारवर भरोसा न्हाय काय?

‍विशेष सुचना : ज्यांना विनोदी भाषा कळत नाही त्यांनी लेख नाही वाचला तरी चालेल.विशेष करून भक्तांनी. साधारण सायंकाळच्या पाच वाजेची वेळ असेल, मी ऑफीसातलं काम संपवुन घराच्या दिशेने चाललो होतो तेव्हा बाजुच्या दुकानातुन अचानक माझ्या नावाने आरोळी आली.अचानक आलेली आरोळी ऐकुन मी मागे पाहीले तर ती आरोळी माझ्याच एका नातेवाइकाने दिली होती.कधी जास्त न बोलणारे म्हणुन मी त्यांच्या हाकेला ओ देत रस्त्याच्या बाजुलाच असणाऱ्या एका दुकानात जेथे ते बसले होते तीथे गेलो. मी काही बोलण्याच्या आत त्यांनी “ सरकारवर भरोसा नाही का ?” असा प्रश्न मला विचारला.हा प्रश्न त्यांनी मलाच का विचारला या गोष्टीचा अंदाज मला लगेचच लागला ( कारण थोडयाच वेळार्वी राज्यातील सरकारने मराठा आरक्षणाचे विधेयक कसलाही आक्षेप न घेता एकमताने संमत केले होते. त्याचाच सोहळा ते त्या दुकानातील दुरचित्रवाणीवर बघत बसले होते आणि शेवटी याच सरकारने मराठा आरक्षण दिले की नाही म्हणत टिऱ्या बडवीत वाहवा लुटत होते.त्यावर मी मागील सरकारने गंडवले हे देखील गंडवणार अश्या आषयाची एक पोस्ट थोबाडपुस्तकावर ( फेसबुक ) लीहीली होती. ) ती त्यांनी पाहीली असावी त्या...

व्हाट इज लव?

Image
प्रेम म्हणजे काय ? खर तर आजच्या या बॉलीवुडच्या जमान्यात हा प्रश्न विचारणे   म्हणजे अज्ञानाचे लक्षण ठरेल पण खरे प्रेम म्हणजे काय असं विचारल तर.... तर मात्र बरेच जण गोंधळात पडतील कारण प्रत्येकाची आपआपली वेगवेगळी प्रेमाची व्याख्या आहे.कुणी काळजी घेण्याला प्रेम समजत तर कुणी काळजी करण्याला प्रेम समजतं.कोणी आकर्षणाला प्रेम समजतं तर कोणी आवडण्याला प्रेम समजुन बसतात तर काहीजण भलत्याच प्रकाराला प्रेम म्हणतात. आवड आणि प्रेम या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत.एखादी व्यक्ती आवडल्यानंतरच प्रेम होत हे जरी खर असलं तरी आवड आणि प्रेम वेगवेगळेच कारण चित्रपटातल्या नट-नटया आपल्याला आवडत असले तरी ते एक आकर्षण असतं जे प्रत्येकाला आहे.हल्लीच्या जमान्यात प्रेम सुध्दा मॅगी सारख झालं आहे.पाच मिनीटांत प्रेम होतं आणि आठवडयात संपत देखील मग हे खरं प्रेम झालं का.खरं प्रेम कुठुन येत त्यात काय म्हत्वाच असतं . बाह्य सौंदर्य ? आईच प्रेम बघा कस असतं एखाद्या आईचं बाळ कुरूप जरी असलं तरी त्या आईला ते प्रिय असतं ती आई त्या बाळाला टाकुण देत नाही उलट ती त्याची जास्त काळजी घेते.त्याला प्रत्येक गोष्टीत विश्वास देते.त्या...

"ये सूरत बदलनी चाहिए"

आपण भारतीय म्हणजे शांत,संयमी आणि मायाळु लोकं.आपला भावनांक नेहमी बुध्यांकावर मात करत असल्यामुळे अपण बऱ्याचवेळा लोकांच्या खोट्या बोलण्याला देखील बळी पडतो.म्हणुनच आपण नेहमी आपल्या देशातील नेत्यांच्या आश्वासनांवर विश्वास ठेऊन प्रत्येक वेळा त्यांना निवडुन देत असतो आणि नेहमी फसत असतो पण पुन्हा आपल्याला कोणीतरी भावनीक साथ घालत येत आपल्याला पुन्हा फसवत. आपण समजतो आज नाहीतर उद्या तरी हा आपले काम करेल या वेड्या आशेपोटी आपण या भामट्या मंडळींच्या आहारी जाऊन नकळत त्यांच्या सारखे निर्दयी होऊन जातो हे आपले आपल्याला कळत नाही.त्यातली त्यात आज तर निर्दयीपणाची स्पर्धाच लागली की काय असे वाटायला लागले आहे ; कारण आपल्या देशात आणि शहरात अशा काही घटना घडत आहेत ज्यांच्यामुळे आपल्यात माणुसकी आणि प्रेम नावाचे काही गुण शिल्ल्क आहेत की नाही यावर प्रश्न उपस्थित करावासा वाटतो.           खुप दिवसांपुर्वीच्या नाही अगदी या आठवडयातील काही घटना पाहल्या तर आपणास देखील या गोष्टीचा प्रत्यय येईल.काल परवा सोशल मिडीयावर एक पोस्ट फिरत होती,युपी मधल्या एका अल्पवयीन मुलीस जिवंत ज...

"सोशल मिडीयाचा असाही वापर "

Image
फेसबुक 2004 साली उदयास आलेल एक सोशल मीडीया ( समाज माध्यम ) हे माध्यम “ फ्रेंड ऑफ फ्रेंड ” या प्रकारातील असल्यामुळे यावर तुम्ही काही   लीहील अथवा अपलोड केल की ते तुमच्या मित्रांना तर दिसतच त्याचबरोबर तुमच्या मित्रांच्या मित्रांना देखील दिसत ज्यांना तुम्ही ओळखत देखील नसता मग ते देखील त्यावर त्यांची आवड अथवा प्रतीक्रीया देऊ शकतात आणि तुम्ही नविन मित्र जोडु शकता याच वैशिष्ट्यामुळे हे माध्यम इतक्या कमी कालावधीत एवढ प्रचंड लोकप्रिय झाले की असे अनेक समाज माध्यम उदयास आली ती देखील लोकप्रिय झाली परंतु फेसबुकच्या लोकप्रीयतेत तसुभरही कमतरता आली नाही.सद्य स्थितीत फेसबुकची कार्यरत वापरकर्ता संख्या 2 अब्जाहुनही अधिक आहे तर जगाची एकुण लोकसंख्या 7.3 अब्ज असल्याची समजते यावरून या समाज माध्यमाच्या लोकप्रियतेचा अंदाज लावता येवु शकेल.           फेसबुकच्या सुरूवातीचा काळातील वापर म्हणजे जुने मित्र / मैत्रीण शोधणे व त्यांच्याशी गप्पा मारणे हा होता परंतु जसजशी इंटरनेट क्रांती होत गेली शहरातील इंटरनेट खेडोपाडी आणि गल्लोगल्ली चालायला लागल तसतशी सामान्...

अपयश नव्हे ते यशच

Image
परवा दिवशी वर्तमान पत्र उघडल पाहतो तर काय? अगदी पहील्याच पानावर परिक्षेत मार्क कमी मिळाले म्हणुन विद्यार्थ्याची आत्महत्या अशी ठळक अक्षरातील बातमी दिसली.केवळ परिक्षेत कमी गुण मिळाले म्हणुन निराश होऊन जिवन संपवले वाचुन खुप वाईट वाटले.आणि मनात विचार आला की,आजच्या ह्या एकविसाव्या शतकातील हे मुलं एवढया कमकुवत मानसिकतेचे कसे असतील आणि यांचे 10 वी 12 वी मार्क यांचे आयुष्य ठरवणार आहेत का? या मुलांवर विनाकारण दबाव आणनारे कोण तर त्यांचेच पालक आणि नातेवाईक कारण तेच फोन करून सांगतात ना आमच्या भैय्याला 98 टक्के पडले तुमच्या भैय्याला किती पडले? आपण देखील आपल्या मुलाला टोमने मारायला सुरू करतो त्याला 98 पडले तुच कसा असा मुर्ख निघाला.बर मला हे सांगा तो 98 वाला जिवनाच्या परिक्षेत पास होईल का? मी कित्येक मुलांना पालकांच्या अपेक्षांच्या ओझ्याखाली दबलेल पाहील आहे.अशी मुल जगण विसरत चालली आहेत.ती एकलकोंडी होत आहेत.जगण्यातला निखळ आनंद त्यांच्या वाट्याला येत नाहीये.अगोदर त्यांना मोकळा श्वास घेऊ द्या.त्यांना भरपुर जगु द्या, त्यांच्याशी गप्पा मारा, त्यांना काय आवडत काय नाही ते बघा.अन्यथा अशी मुल केवळ पालकांच...

सोशल मीडिया

Image
सोशल मीडीया आज सकाळी सहज वॉट्सअप उघडले अन पाहतो तर काय? अगदी मोबाईल हँग व्हावा एवढे मॅसेज एकानंतर एक येऊन धडकायला सुरूवात झाली.थोडावेळ नुसते बघतच रहावे लागले आणि मग कुठे संदेश ऊघडायला सुरूवात झाली.मी एक-एक संदेश पाहत होतो त्यात शुभ सकाळ,शुभ,दुपार,शुभ रात्री,हा संदेश अकरा जणांना पाठवा........सह अनेक संदेश होते.एका मित्राने पाठवलेला छानसा संदेश वाचला व त्याचे अभिनंदन केले.एवढे चांगले संदेश सुचतात कसे असा प्रश्न मी त्याला करताच त्याचा रिप्लाय आला ‘गुगल प्ले स्टोर’ वर सर्व ॲप्स मिळतात.त्यामध्ये सर्व प्रकारचे संदेश असतात.तोपर्यंत काही मित्रांनी त्या संदेशाला दाद द्यायला सुरूवात केली होती. त्याने मला एका ॲप्लीकेशनची लींक पाठवली मी सहज उघडुन पाहीतली पाहतो तर काय त्यामध्ये सर्व प्रकारचे संदेश अगदी यादी करून तयार होते.केवळ कॉपी करा आणि हवे तेथे पोस्ट करा.सुविचार,वैचारीक,गुड मॉर्निंग,गुड नाईट,हॅपी बर्थ डे,शुभेच्छा संदेश,दुख संदेश इ.अनेक प्रकारचे संदेश त्यात अगदी तयार होते.मग मला प्रश्न पडला या रेडीमेड संदेशाने मानसाच्या भावना माणसापर्यंत पोहोचत असतील का? यामध्ये आजची तरूण पीढी गुरफटत तर चालली न...

पिंपळनेर तालुका निर्मीती बद्दल माझे मत

Image
पिंपळनेर तालुकानिर्मीतीबद्दल माझे मत... गणेश इंगोले पिंपळनेर मो. ९५६१४३०६७१ पिंपळनेर सर्कल म्हटल की मला आठवतं ते इथल्या जेष्ठ नागरीकांनी सांगीतलेल व वर्तमान पत्रातुन वाचलेल कधी काळी गल्ली ते दिल्ली सत्तेची फळे चाखणार पिंपळनेर,पण आज जर या गावाकडे पाहीतल तर गावाचा जो विकास व्हायला पाहीजे होता तेवढ्या प्रमाणात झाला नाही.आज या गावाची अवस्था त्या बैलासारखी झाली आहे जो आयुष्यभर मालकाच्या शेतात राब-राब राबतो अन मालक त्याला त्याच्या म्हातारपणी खाटकाला विकतो.कारण जर निरीक्षण केल तर अस लक्षात येईल की या गावातील बहुतांश लोक हे बाहेरून आलेले आहेत.बाहेरून येऊन इथे व्यवसाय,शेती करणारे या लोकांना देखील या गावाने भरभरून दिले आहे.मात्र आता वेळ आली आहे आपण या गावाला काही देण्याची या गावाचा विकासाचा अनुशेष भरून काढण्याची विकासाचा अनुशेष जर कशाने भरुन निघणार असेल तर याच उत्तर कदाचीत तालुका निर्मीतीच्या प्रश्नात दडलेल असाव.म्हणुन या गावातुन व सर्कल मधुन मोठ्या प्रमाणत या प्रश्नावर सक्रीय होण्यची आणि लोकअंदोलन उभारण्याची गरज आज भासताना दिसुन येत आहे.   काल परवा वर्तमान पत्रात वाचल अंबेजोगाई ...

सकारात्मक विचार

जिदंगी मे कभी भी किसी को बेकार मत समझना,क्योक़ि बंद पडी घडी भी दिन में  दो बार सही समय बताती है। 2. किसी की बुराई तलाश करने वाले इंसान की मिसाल उस मक्खी की तरह है जो सारे खूबसूरत जिस्म को छोडकर केवल जख्म पर ही बैठती है। 3. टूट जाता है गरीबी मे वो रिश्ता जो खास होता है, हजारो यार बनते है जब पैसा पास होता है। 4. मुस्करा कर देखो तो सारा जहाॅ रंगीन है, वर्ना भीगी पलको से तो आईना भी धुधंला नजर आता है। 5..जल्द मिलने वाली चीजे ज्यादा दिन तक नही चलती, और जो चीजे ज्यादा दिन तक चलती है वो जल्दी नही मिलती। 6. बुरे दिनो का एक अच्छा फायदा अच्छे-अच्छे दोस्त परखे जाते है। 7. बीमारी खरगोश की तरह आती है और कछुए की तरह जाती है; जबकि पैसा कछुए की तरह आता है और.खरगोश की तरह जाता है। 8. छोटी छोटी बातो मे आनंद खोजना चाहिए क्योकि बङी बङी तो जीवन मे कुछ ही होती है। 9. ईश्वर से कुछ मांगने पर न मिले तो उससे नाराज ना होना क्योकि ईश्वर वह नही देता जो आपको अच्छा लगता है बल्कि वह देता है जो आपके लिए अच्छा होता है 10. लगातार हो रही असफलताओ से निराश नही होना चाहिए क्योक़ि कभी-कभी गुच्छे की आखिरी चाबी भी ताला खोल द...
Image
सर्वाना विनंती आहे कि, हा मॅसेज काळजीपूर्वक वाचा व विचार करा आणि शक्यतो तेवढा फोरवर्ड करा.. २०/- रुपये डझन या दराने मृत्यू विकला जात आहे. माझी सर्वाना विनंती आहे कि सावध राहा. मित्रांनो आपण सर्वाना केळे खूप आवडते आणि आपण भरपूर खातो. परंतू सध्या बाजारात येणारी केळी हि carbide युक्त पाण्यात भिजवून पिकवली जात आहेत. हि केळी खाल्ल्यास १००% "CANCER" अथवा पोटाचे विकार होऊ शकतात. त्यामुळे शहाणे व्हा आणि अशी केळी खाऊ नका. एखादे केळे carbide चा वापर करून पिकवले आहे हे कसे ओळखल.? केळे न ैसर्गिक रित्या पिकवले जाते त्या वेळी त्याचे देठ कोमेजते ( काळे पडते ). नैसर्गिक पिकवलेल्या केळ्याचा रंग गर्द पिवळा असतो आणि त्याच्यावर थोडेफार काळे काळे डाग असतात. जर तेच केळे carbide चा वापर करून पिकवले असेल तर त्याचे देठ हिरवे असते आणि केळ्याचा रंग lemon yellow असतो. इतकेच नाही तर ते एकदम स्वच्छ पिवळे दिसते. बिलकुल डाग नसतात. Carbide म्हंजे काय आणि त्याचे गुणधर्म kay.? Carbide जर पाण्यात मिसळले तर ते heat emit करते. खेड्यामध्ये जिथे LPG cylinder उपलब्ध नसतात तिथे एका close tank मध्ये ...

संदर्भ संतांचा खरा इतिहास

     आजचे प्रश्न निर्माण होताना त्यांची पाळेमुळे ही भुतकाळात खोलवर गेलेली असतात.'काल' च्या पोटातुन 'आज' निर्माण होतो.'आज' च्या श्वासातुन 'उद्या' आकार घेत असतो.उद्याच्या सुंदर दिवसासाठी आजचा श्वास मोकळा होणे गरजेचे आहे.त्यासाठी 'काल' झालेल्या चुकांवर योग्य औषोधोपचारांची गरज आहे. (साभार संतांचा खरा इतीहास,लेखक प्रा.अजित जाधव )
One Day I Will Be a Rock Star Not Immedietly But Definetly